शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

वहिनीवर गोळीबार करून फरारी असलेल्या संशयितास इस्लामपूर बस स्थानकावर अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 12:15 IST

 घरगुती वादातून वहिनीवर गोळीबार करून गेल्या वर्षभरापासून फरारी असलेल्या शशिकांत ऊर्फ आबा मारुती हुबाळे (रा. वाळवा) या संशयिताला गुंडाविरोधी पोलिस पथकाने बुधवारी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल व जिवंत काडतूस असा ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसांगलीतील गुंडाविरोधी पथकाची कारवाई इस्लामपूर बस स्थानकावर केली सापळा रचून अटक पिस्तूल, जिवंत काडतूस असा ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त संशयित हुबाळे होता वर्षभरापासून फरार

सांगली ,दि. ०२ : घरगुती वादातून वहिनीवर गोळीबार करून गेल्या वर्षभरापासून फरारी असलेल्या शशिकांत ऊर्फ आबा मारुती हुबाळे (रा. वाळवा) या संशयिताला गुंडाविरोधी पोलिस पथकाने बुधवारी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल व जिवंत काडतूस असा ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे व अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी अवैध शस्त्रे, अंमली पदार्थ विक्री व फरारी संशयितांचा शोध घेण्याचे आदेश गुंडाविरोधी पथकाला दिले होते.

पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या पथकाला, वर्षभरापासून फरारी असलेला शशिकांत हुबाळे इस्लामपूर बसस्थानकावर येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने हुबाळे याला इस्लामपूर बस स्थानकावर सापळा रचून अटक केली. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतुस मिळाले.

हुबाळे हा वर्षभरापासून फरार होता. त्याने २४ जुलै २०१६ रोजी वहिनी सुषमा सुनील हुबाळे यांच्यावर गोळीबार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला होता. ही घटना घरगुती वादातून सुषमा यांच्या माहेरी पलूस येथे घडली होती. या हल्ल्यात सुषमा यांच्या पायाला गोळी लागून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.

शशिकांत याला मदत करणाऱ्या  दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली होती, पण तो फरार झाला होता. वर्षभरापासून पोलिस त्याचा शोध घेत होते. अखेर तो इस्लामपूर बस स्थानकावर जेरबंद झाला. त्याला पुढील तपासासाठी पलूस पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले.

या कारवाईत पोलिस कॉन्स्टेबल शंकर पाटील, महेश आवळे, मेघराज रुपनर, सचिन कुंभार, योगेश खराडे, सागर लवटे, वैभव पाटील, संकेत कानडे, आर्यन देशिंगकर, सुप्रिया साळुंखे, किरण खोत यांनी भाग घेतला.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस