शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेच्या दुर्लक्षामुळे टर्फ विकेट गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:07 IST

क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर, जगविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांच्यासह अनेकांच्या कौतुकास प्राप्त ठरलेल्या सांगलीच्या छत्रपती शिवाजी क्रीडांगणावरील टर्फ विकेटची अवस्था सध्या दयनीय झाली

ठळक मुद्देमैदानावर नवीन खेळपट्टी बनविण्याची गरजशिवाजी क्रीडांगणावरील अवस्था । क्रिकेट खेळाडंूमध्ये नाराजी

शीतल पाटील ।सांगली : क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर, जगविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांच्यासह अनेकांच्या कौतुकास प्राप्त ठरलेल्या सांगलीच्या छत्रपती शिवाजी क्रीडांगणावरील टर्फ विकेटची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. महापालिकेने या विकेटची देखभाल न केल्याने तेथील गवत वाळून गेले आहे. त्यामुळे क्रीडांगणावर प्रशिक्षणासाठी येणाऱ्या खेळाडंूमध्ये नाराजी पसरली असून रणजी ट्रॉफीसारखे राष्ट्रीय सामने भरविण्याचे स्वप्न अंधुक बनले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू विजय हजारे ते स्मृती मानधनापर्यंत अनेक खेळाडूंनी सांगलीचे नाव क्रिकेट विश्वात चमकविले आहे. आजही छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर हजारो खेळाडू क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यातील काही खेळाडू राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरीही करीत आहेत. पण या खेळाडूंना सध्या मॅटवर सराव करावा लागतो. कारण क्रीडांगणावरील टर्फ विकेटच सध्या गायब झाली आहे.

काँग्रेसचे नेते मदन पाटील यांनी क्रिकेट खेळ रुजविण्यासाठी शिवाजी क्रीडांगणावर टर्फ विकेट बनवली होती. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील सामने अशाच विकेटवर होतात. सांगलीच्या खेळाडूंना एक चांगली संधी यानिमित्ताने मिळाली होती. या टर्फ विकेटच्या देखभालीची जबाबदारी महापालिकेवर आहे. काही वर्षापर्यंत महापालिकेने ही विकेट जपली होती.

क्रीडांगणाच्या मधोमध हिरवीगार विकेट क्रिकेट खेळाडूंना आकर्षित करीत असे. याच विकेटवर सचिन तेंडूलकर, विनोद कांबळी, अर्जुन रणतुंगा, जयसूर्या यांसारख्या दिग्गज खेळाडूंनी फलदांजीही केली आहे. खुद्द रमाकांत आचरेकर यांनीही या विकेटचे कौतुक केले होते. पण कालांतराने महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ही विकेट अत्यंत खराब झाली आहे. विकेटवरील गवत वाळून गेले आहे. त्याची निगा राखली गेलेली नाही. विकेटवर खड्डे पडू लागले आहेत. त्यामुळे खेळाडूंना ती वापरताच येत नाही, अशी स्थिती आहे. पण याकडे महापालिकेचे लक्षच नाही.मॅटवर सराव करण्याची वेळसांगलीमधून अनेक खेळाडू राज्य, राष्ट्रीय पातळीवर सामने खेळण्यासाठी जातात. तिथे त्यांना टर्फ विकेटवर खेळावे लागते. पण सांगलीत टर्फ विकेट नसल्याने त्यांना मॅटवर सराव करावा लागतो. पुणे-मुंबईस खेळावयास गेल्यानंतर या खेळाडूंना अडचणीना सामोरे जावे लागते. सांगलीत सध्या विलिंग्डन महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर टर्फ विकेट आहे. काही खेळाडू तिथे जाऊन सराव करतात. महापालिकेने तातडीने लक्ष घालून शिवाजी क्रीडांगणावरील टर्फ विकेट पुनरुजीवित करावी, अशी मागणी शहरातील क्रिकेट खेळाडूंमधून होत आहे.

शिवाजी क्रीडांगणावरील टर्फ विकेट वाचविण्यासाठी सर्वच संघटना, क्रीडाप्रेमींनी एकत्र येण्याची गरज आहे. मॅट व टर्फ विकेट या दोन्हीवरील सरावात फरक पडतो. टर्फ विकेटवरच सामने होत असल्याने सांगलीची विकेट पुनरुजीवित झाली तर त्याचा फायदा खेळाडूंना निश्चित होईल. त्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा.- अनिल जोब, क्रिकेट प्रशिक्षकशिवाजी क्रीडांगणावरील टर्फ विकेट पुनरुजीवित करण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात तरतूद केली जाणार आहे. तेथील तीनही पिच दुरुस्त केले जातील. हे काम जूनमध्ये सुरू करण्यात येणार आहे.- अमजद जेलर, क्रीडाधिकारी, महापालिकासांगलीतील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरील टर्फ विकेटची दुरवस्था झाली आहे. मैदानावरील गवत वाळून गेले असून, डागडुजीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

टॅग्स :SangliसांगलीKhelo Indiaखेलो इंडिया