शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

उत्तम शेतकरी ते मंत्री व्हाया यशस्वी व्यावसायिक, सुरेश खाडेंचा राजकीय प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 13:29 IST

देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप-सेनेच्या सरकारमध्ये शेवटचे वर्षभर त्यांना सामाजिक न्याय मंत्रिपद मिळाले होते.

श्रीनिवास नागेमिरज (सांगली) : उत्तम शेतकरी ते मंत्री व्हाया यशस्वी व्यावसायिक असा राजकीय प्रवास केलेल्या सुरेश खाडे यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मिरज विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा भाजपतर्फे आमदार सुरेश दगडू खाडे यांनी विजय मिळविला आहे.१ जून १९५८ रोजी तासगाव तालुक्यात पेड येथील गरीब दलित कुटुंबात जन्मलेल्या सुरेश खाडे यांनी व्हीजेटीआय, मुंबई येथून वेल्डिंग डिप्लोमा (पदविका) पूर्ण केला. सुरुवातीला जत आणि नंतर मिरज राखीव विधानसभा मतदारसंघातून ते चार वेळा भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप-सेनेच्या सरकारमध्ये शेवटचे वर्षभर त्यांना सामाजिक न्याय मंत्रिपद मिळाले होते.विधानसभेची अनुसूचित कल्याण समिती, अंदाज समिती, पंचायत राज समिती, उपविधान समितीचे सदस्य, राहुरी कृषी विद्यापीठाचे संचालक, सांगली जिल्हा ग्रामीण भाजप अध्यक्ष, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.जिल्ह्यात पहिले कमळ फुलविले२००४ मध्ये जत राखीव मतदारसंघातून निवडून येऊन खाडे यांनी जिल्ह्यात पहिले कमळ फुलविले. त्यानंतर २००९ साली मुस्लीमबहुल मिरज मतदारसंघात प्रथमच खाडे यांनी भाजपला विजय मिळवून दिला. २००९ साली ५४ हजार व २०१४ साली ६४ हजारांचे मताधिक्य त्यांनी घेतले. दोन्ही वेळेस त्यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती. मात्र, त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत त्यांचे मताधिक्य ३० हजारांपर्यंत कमी झाले.गेल्या पाच वर्षांत त्यांच्या नेतृत्वाखाली मिरज मतदारसंघात ४९ पैकी ३७ ग्रामपंचायतीत भाजपने बहुमत मिळविले. स्वातंत्र्यापासून काँग्रेसच्या ताब्यात असलेली मिरज पंचायत समितीची सत्ता मिळविली. ७ पैकी ५ जिल्हा परिषद गटात भाजपचे सदस्य निवडून आले. महापालिकेत मिरज शहरातील २७ पैकी १३ नगरसेवक निवडून आले. मिरजेत इंग्रजी माध्यमाची शाळा त्यांनी सुरू केली आहे. सामाजिक कार्याबद्दल कोलंबो विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी देऊन त्यांना सन्मानित केले आहे. दास ऑफशोअर हा उद्योग व शेती त्यांचा व्यवसाय आहे. पत्नी सुमन, विवाहित मुले प्रशांत व सुजीत असा त्यांचा परिवार आहे. दोन्ही मुलांचा स्वतंत्र व्यवसाय आहे. समाज कार्य, वाचन व संगीताची आवड असलेले आमदार सुरेश खाडे पंढरीच्या विठ्ठलाचे भक्त आहेत.

टॅग्स :Sangliसांगली