शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
2
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
3
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
4
षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; ५०० रूपयांत दहशतवादी मसूद अजहरची बहीण चालवतेय कोर्स
5
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
6
तब्बल ५५०० किलो सोन्यातून उजळले भगवान बुद्ध; एका चुकीने उलगडलं कित्येक दशक दडलेले 'रहस्य'?
7
"अक्षय कुमार सध्या डिप्रेशनमध्ये आहे, कारण..."; 'हेरा फेरी'चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा मोठा खुलासा
8
शौक बड़ी चीज है! दृष्टी गमावताच डोळ्यात बसवला २ कॅरेटचा हिरा, रंगली तुफान चर्चा
9
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
10
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
11
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
12
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
13
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
14
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
15
फ्रान्सच्या संग्रहालयात 'धूम' स्टाईल चोरी; ८०० कोटींचे दागिने घेऊन चोर फरार; ७ मिनिटांत झाला 'गेम'
16
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...
17
Neeraj Chopra Lieutenant Colonel : राजनाथ सिंह अन् सेनाप्रमुखांकडून 'गोल्डन बॉय'चा सन्मान (VIDEO)
18
अंतर्गत मतभेदांदरम्यान टाटा ट्रस्ट्सनं वेणू श्रीनिवासन यांची आजीवन विश्वस्त म्हणून केली नियुक्ती; आता मेहली मिस्त्री यांच्यावर नजर
19
मोठी बातमी! सोन्या-चांदीचा बुडबुडा फुटला....! एकच झटक्यात सोनं 3725 तर चांदी 10549 रुपयांनी स्वस्त! जाणून घ्या कारण
20
भारी! WhatsApp, Instagram चॅटिंग होणार सुरक्षित; स्कॅम रोखण्यासाठी मेटाने आणलं नवीन टूल

ऑक्सिजन व रेडमीसिवीरचा पुरवठा दोन दिवसात सुरळीत होईल- शंभुराज देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 11:47 IST

Shambhuraj Desai Sangli CoronaVirus : वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर कोरोना रूग्णांना चांगले उपचार मिळण्यासाठी विटा शहरात सुरू असलेल्या कोविड रुग्णालयात आवश्यकतेनुसार ऑक्सिजन बेडची संख्या वाढवा, असे आदेश देऊन ऑक्सिजन व रेडमीसिवीरचा पुरवठा येत्या दोन दिवसांत सुरळीत होईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

ठळक मुद्देऑक्सिजन व रेडमीसिवीरचा पुरवठा दोन दिवसात सुरळीत होईलविटा येथे शंभुराज देसाई यांनी घेतली आढावा बैठक

विटा : वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर कोरोना रूग्णांना चांगले उपचार मिळण्यासाठी विटा शहरात सुरू असलेल्या कोविड रुग्णालयात आवश्यकतेनुसार ऑक्सिजन बेडची संख्या वाढवा, असे आदेश देऊन ऑक्सिजन व रेडमीसिवीरचा पुरवठा येत्या दोन दिवसांत सुरळीत होईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.विटा येथील पंचायत समितीच्या सभागृहात बुधवारी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबाबत केलेल्या विविध उपाय योजना आणि स्थानिक पातळीवर कायदा व सुव्यवस्था याबाबत मंत्री शंभूराज देसाई यांनी आढावा बैठक घेतली.

यावेळी आमदार अनिल बाबर, जिल्हा पोलिस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम, पोलीस उपअधीक्षक अंकुश इंगळे, प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेत शेळके, विटा पालिकेचे मुख्याधिकारी अतुल पाटील, पोलीस निरीक्षक संतोष डोके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते, आनंदराव पवार, सभापती महावीर शिंदे यांच्यासह अन्य अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी मंत्री देसाई यांनी सध्याचा काळ हा अत्यंत कठीण काळ आहे. प्रशासनातील सर्व घटकांनी एकत्र येऊन लोकांना दिलासा देण्याची गरज आहे. पण राज्यातील लोकांनी शासनाला योग्य प्रकारे सहकार्य केले तर महिनाभरात आपण या संकटावर मात करू. विटा शहरासह खानापूर तालुक्यात संचारबंदीची कडक अंमलबजावणी करावी. कायदा मोडतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, असा आदेश यावेळी त्यांनी दिला.यावेळी तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या, विटा शहर व परिसरात रुग्णालयांची उभारलेली यंत्रणा आणि सुरू असलेले लसीकरण या बाबत माहिती दिली. तसेच सध्या सुरू असलेल्या संचारबंदी आणि लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध कठोर उपायांची माहिती दिली. त्यानंतर मंत्री देसाई यांनी संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर विट्यातील मुख्य शिवाजी महाराज चौकातील कायदा सुव्यवस्थेची आणि बंदोबस्ताची पाहणी केली.यावेळी मंत्री देसाई यांनी कोणत्याही क्षणी शासन कडक निर्बंध लागू करेल, यासाठी पोलीस दलाची बंदोबस्त, नाकेबंदी इत्यादी संदर्भाची तयारी असली पाहिजे. केंद्र शासनाने १८ वर्षावरील सर्व व्यक्तींचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे लसीकरण केंद्राच्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लसीकरणच्या ठिकाणी गर्दी होऊ नये, याची तयारीही पोलीस यंत्रणेने करावी, असे आदेश ही दिले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याShambhuraj Desaiशंभूराज देसाईSangliसांगली