शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आषाढीसाठी मिरजेतून पंढरपूरला भजनी वीणांचा पुरवठा, दीडशे वर्षापासून अविरत परंपरा कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 17:32 IST

तीन पिढ्यांपासून मिरजेतील सतारमेकरांची निर्मिती

सदानंद औंधेमिरज : आषाढी एकादशीजवळ येत असल्याने वारकऱ्यांसाठी भजनी वीणा तयार करण्यासाठी मिरजेतील तंतुवाद्य कारागिरांची धावपळ सुरू आहे. गेली दीडशे वर्षे मिरजेत तयार झालेल्या भजनी वीणा आषाढी कार्तिक वारीला पंढरपूरला पाठविण्यात येतात.टाळ व मृदंग व वीणेच्या साथीने वारकरी विठ्ठलाची भक्ती करतात. दरवर्षी आषाढी वारीला पंढरपुरात वीस लाख वारकरी जमतात. या वारकऱ्यांसाठी दरवर्षी सुमारे दहा हजार भजनी वीणाची मागणी असते. मात्र या वीणा तयार करणे वेळखाऊ असल्याने एवढ्या मोठ्या संख्येने वीणांच्या मागणीची पूर्तता होऊ शकत नसल्याचे मिरज तंतुवाद्य क्लस्टरचे अध्यक्ष मोहसीन मिरजकर यांनी सांगितले. मिरजेतील तांतुवाद्य कारागीर भजनी वीणा बनविण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तीन पिढ्या येथील सतारमेकर या नावाने ओळखले जाणारे मुस्लिम तंतुवाद्य कारागीर भजनी वीणा बनवितात. दरवर्षी मिरजेत मोठ्या प्रमाणात भजनी वीणा तयार होतात. तिसऱ्या व चौथ्या पिढीतही मिरजेत वीणा बनविण्याची परंपरा सुरू आहे. आषाढी एकादशीशिवाय, कार्तिकी एकादशीला आळंदी येथे व नाथषष्ठीला पैठण येथे मिरजेतून भजनी वीणा रवाना होत असल्याचे उस्मानगणी सतारमेकर यांनी सांगितले. वारकऱ्यांसाठी तयार होणाऱ्या भजनी वीणेची किमत साडेतीन ते नऊ हजार रुपयापर्यंत आहे. भजनी वीणा सुमारे पाच वर्षे टिकते. मिरजेतून आयात करून पंढरपुरात विणांची विक्री होते. भजनी वीणेशिवाय पखवाज व तबल्यालाही मागणी असते. तंतुवाद्यनिर्मितीसाठी ख्याती असलेल्या मिरजेतील तंतुवाद्य कारागिरांनी पूर्वजांचा वारसा निष्ठेने जोपासला आहे. देश-विदेशांतील नामांकित गायक-वादकांना मिरजेतून दर्जेदार तंतुवाद्ये पुरविण्यात येतात. देशातील प्रसिद्ध संगीत महोत्सवात कलाकारांना तंतुवाद्यांचा पुरवठा मिरजेतून होतो.२०० वर्षांपासून तंतुवाद्य निर्मितीमिरजेत २०० वर्षांपासून तंतुवाद्य निर्मिती सुरू आहे. मिरजेत तयार होणाऱ्या सतार व तंबोऱ्याला जीआय नामांकनही मिळाले आहे. मिरजेतील तंतुवाद्य कला टिकावी, वाढावी यासाठी उद्योग विभागाने सतार व तंबोरा ही तंतुवाद्ये तयार करणाऱ्या कारागिरांसाठी क्लस्टर योजनेसही काही वर्षांपूर्वी मंजुरी दिली आहे. मिरजेतील तंतवाद्य निर्माते मजीद सतारमेकर यांना नवी दिल्ली येथील संगीत नाटक अकादमी संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.