शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत घरगुती गॅसचे रिफिलिंग करताना पुरवठा विभागाच्या धाडी, गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 17:27 IST

लोकमतच्या बातमीनंतर पुरवठा विभागाकडून कारवाईचा धडाका

सांगली : शहरात घरगुती गॅसचा अवैधरित्या तीन व चार चाकी वाहनांमध्ये रिफिलिंग होत असल्याची तक्रार जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल यांच्याकडे प्राप्त झाली. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी अवैधरित्या घरगुती गॅसचा वापर होत असलेल्या ठिकाणी धाडी टाकून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर पहिली धाड सांगली शहरात टाकली असून एक विद्युत मोटार, काही गॅसच्या पुंगळ्या, पाइप इत्यादी साहित्य जप्त केले. परंतु, याठिकाणी अवैध व्यवसाय करणारे कोणीही सापडले नाही. त्यामुळे धाडीत मिळालेल्या वस्तू ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला आहे.आणखी एका ठिकाणी गॅस रिफिलिंग होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सांगली येथील ५० फुटी रोडवर असलेल्या अलअमीन मराठी प्री-प्रायमरी शाळेजवळ मिलन गादी कारखान्याशेजारी मोकळ्या जागेत हाच प्रकार सुरू होता. घरगुती गॅस दुसऱ्या गॅस टाकीमध्ये रिफिलिंग करताना दोन भरलेले व एक रिकामी असे तीन सिलिंडर, एक इलेक्ट्रिक वजन काटा, इतर साहित्य जप्त केले. संबंधिताविरोधात सांगली शहर पोलिस स्टेशनमध्ये जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागरिकांनी तक्रार करावी..जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी आशिष फुकुले यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षक गोपीचंद वडार, श्रीकांत चोथे, वर्षा कदम, निखिल सोनवणे यांनी ही कारवाई केली. नागरिकांनी असा प्रकार तुमच्या भागात होत असल्याचे आढळून आल्यास सांगलीच्या जिल्हा अन्नपुरवठा कार्यालयाकडे तक्रार करावी, असे आवाहन आशिष फुकुले यांनी केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीCylinderगॅस सिलेंडर