शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

पूरबाधित गावांना टँकरने शुध्द पाणी पुरवा, स्वच्छतेची मोहिम तातडीने राबवा : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 18:44 IST

Sangli Flood Collcator : नदी काठच्या गावांमध्ये पूरपरिस्थिती असून या गावांना शुध्द पाण्याचा पाणी पुरवठा होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी तालुका प्रशासनाने पूरबाधित गावांना तातडीने टँकरने शुध्द पाण्याचा पुरवठा सुरु करावा, जसजसे गावातील पाणी उतरेल तसतसे स्वच्छतेची मोहिम तातडीने राबवावी असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

ठळक मुद्देआरोग्य तपासणी शिबिरे, प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप सुरु करा नुकसानीचे पंचनामे करताना प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागाला वस्तुनिष्ठ पंचनामे करा

सांगली : नदी काठच्या गावांमध्ये पूरपरिस्थिती असून या गावांना शुध्द पाण्याचा पाणी पुरवठा होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी तालुका प्रशासनाने पूरबाधित गावांना तातडीने टँकरने शुध्द पाण्याचा पुरवठा सुरु करावा, जसजसे गावातील पाणी उतरेल तसतसे स्वच्छतेची मोहिम तातडीने राबवावी असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.जिल्हाधिकाऱ्यांची वारणा काठच्या कणेगाव, बोरगाव, जुने खेड, वाळवा व आष्टा येथे भेटी देऊन पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी तहसिलदार राजेंद्र सबनिस, गट विकास अधिकारी शशिकांत शिंदे, संबधित गावांचे सरपंच, उपसरपंच, सदस्‍य व पदाधिकारी उपस्थितीत होते.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, पूर परिस्थिती कमी होत असून त्यामुळे अन्य आजार उदभवण्याची शक्यता आहे. त्यासाठी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. रोगराई पसरु नये यासाठी गावांमध्ये आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. तसेच प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप संबधित ग्रामपंचायतींनी सुरु करावे. गावांना पुरविण्यात येणाऱ्या पाण्याबाबत योग्य दक्षता घेण्यात यावी. यामध्ये मेडिक्लोर टाकुन शुध्द करण्यात यावे.

शेतीचे झालेले नुकासान, घरांची झालेली पडझड, लोकांच्या घरात गेलेले पाणी त्यामुळे जिवनावश्यक वस्तुंचे झालेले नुकसान याची पाहणी करताना शासनाच्या निकषानूसार पंचनामे करताना नुकसान झालेल्या भागाच्या ठिकाणी प्रत्येक्ष भेटी देऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत व त्याचा अहवाल तातडीने जिल्हा प्रशासनास करावा अशा सूचना तालूका प्रशासनाला दिल्या. 

टॅग्स :floodपूरcollectorजिल्हाधिकारीSangliसांगली