शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नागठाणेत कर्जास कंटाळून शेतकºयाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 15:45 IST

नागठाणे (ता. पलूस) येथील शेतकरी भिकाजी ऊर्फ जगदीश संपत शेळके (वय ४२) यांनी कर्जास कंटाळून नागठाणे-आष्टा मार्गावरील कोंडार मळा भागातील शेतात जनावरांच्या गोठ्यात नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देशेळके यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, मुलगी असा परिवार आहे

वाळवा : नागठाणे (ता. पलूस) येथील शेतकरी भिकाजी ऊर्फ जगदीश संपत शेळके (वय ४२) यांनी कर्जास कंटाळून नागठाणे-आष्टा मार्गावरील कोंडार मळा भागातील शेतात जनावरांच्या गोठ्यात नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी एक वाजता हा प्रकार उघडकीस आला. 

भिकाजी शेळके हे अल्पभूधारक शेतकरी असून, त्यांची नागठाणे येथे  अडीच एकर शेतजमीन आहे. त्यांनी नागठाणे विकास सोसायटी व राष्ट्रीयकृत बँकेकडून साडतीन  लाखाचे कर्ज घेतले होते. शासनाने कर्जमाफीची घोषणा केली, मात्र या कर्जमाफीचा लाभ शेळके यांना मिळाला नव्हता. परिणामी सहा टक्क्याऐवजी बारा टक्के व्याजदराने कर्ज भरण्याची वेळ त्यांच्यावर आली. शिवाय कर्ज थकल्यामुळे मध्यम मुदतीचे कर्ज मिळत नव्हते. सोसायट्या आणि बँकांनी त्यांना कर्ज देण्यास नकार दिला होता.

गेल्या काही दिवसांपासून थकीत कर्जाच्या वसुलीसाठी सोसायटीचा तगादा सुरू झाला होता. मात्र कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत भिकाजी शेळके होते. आर्थिक ओढाताणीमुळे ते त्रस्त होते. या कर्जाला आणि वसुलीच्या तगाद्याला कंटाळूनच मंगळवारी दुपारी त्यांनी शेतातील गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. 

शेळके यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी त्यांचे चुलत बंधू सचिन शेळके यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस नाईक पंकज मंडले व सुप्रिल मोकाशी अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीDeathमृत्यू