शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

नेर्ले येथे जवानाच्या पत्नीची दोन मुलांसह पेटवून घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 23:49 IST

मलकापूर : नेर्ले (ता. शाहूवाडी) येथील विवाहितेने आपल्या दोन लहान मुलांसह पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. स्वाती महेश ...

मलकापूर : नेर्ले (ता. शाहूवाडी) येथील विवाहितेने आपल्या दोन लहान मुलांसह पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. स्वाती महेश पाटील (वय २८), विभावरी महेश पाटील (४), देवांश महेश पाटील (१) अशी या दुर्दैवी माय-लेकरांची नावे आहेत. आत्महत्येमागचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. आत्महत्येचा हा प्रकार गुरुवारी सकाळी दहा वाजता घडला.पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, नेर्ले (ता. शाहूवाडी) येथील शिवाजी बापू पाटील हे पत्नी नंदा, सून स्वाती, नात विभावरी, नातू देवांशसह ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागील बंगल्यात एकत्र राहतात. त्यांचा मुलगा व स्वातीचा पती महेश सन २००८ मध्ये सैन्यात भरती झाला असून सध्या तो जैसलमेर (राजस्थान) येथे सेवेत आहे. भाटशिरगाव (ता. शिराळा) येथे स्वातीचे माहेर असून तिचे वडील कृष्णा धुमाळ हे व्यवसायानिमित्त सध्या पत्नीसह मुंबईत राहतात. सन २०१३ मध्ये स्वातीचा महेशशी विवाह झाला. सव्वा वर्षांपूर्वी दुसऱ्या मुलाच्या प्रसूतीसाठी स्वाती गावी आली होती. चार वर्षांची मुलगी विभावरी कोकरूड येथील नर्सरी स्कूलमध्ये शिकत होती, तर लहान देवांश नुकताच एक वर्षाचा झाला होता.दरम्यान, शिवाजी पाटील यांच्या घरातील किचनच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. गुरुवारी सकाळी सासू नंदा या साफसफाई उरकून दोन्ही नातवंडांसह शेजारीच असलेल्या नातलगांकडे गेल्या तर सासरे गावातील साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेले. दरम्यान, सासू नंदा यांच्याकडे येऊन स्वातीने खाऊ भरविण्याच्या निमित्ताने दोन्ही मुलांना घरी नेले. साखरपुड्याच्या कार्यक्रमावरून सासरे शिवाजी परतल्यानंतर बंगल्याबाहेर झाडाच्या कट्ट्यावर येऊन बसले असता त्यांना काहीतरी जळाल्याचा वास आला. खिडकीतून धूर येऊ लागल्याने घरात शॉर्टसर्किट झाले का म्हणून त्यांनी पत्नीला पाहण्यास सांगितले. यावेळी खोलीचा दरवाजा आतून बंद होता. घरी आलेली मुले व सून दिसत नसल्याने व शंका आल्यामुळे सासूने आरडाओरडा सुरू केला. जमलेल्या नागरिकांनी खोलीचा दरवाजा तोडून आत पाहिले तर स्वातीसह दोन्हीही लहान मुले भाजून निपचित पडली होती. यावेळी स्वाती व विभावरी दोघीही गतप्राण झाल्या होत्या तर लहान देवांशची किंचित हालचाल जाणवल्याने त्याला उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले परंतु वाटेतच त्याचाही मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळाचे छायाचित्रण केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात पाठविले. खबरदारीचा उपाय म्हणून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी स्ट्रायकिंग फोर्सला घटनास्थळी पाचारण केले होते. रात्री उशिरापर्यंत पोलिसांत घटनेची नोंद झाली नव्हती.