गोटखिंडीत शाळेतच दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:26 AM2021-04-13T04:26:22+5:302021-04-13T04:26:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गोटखिंडी : गोटखिंडी (ता.वाळवा) येथे दहावीत विद्यार्थ्याने वर्गातील फॅनला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सिद्धेश सतीश ...

Suicide of a 10th standard student at a school in Gotkhindi | गोटखिंडीत शाळेतच दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

गोटखिंडीत शाळेतच दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

गोटखिंडी : गोटखिंडी (ता.वाळवा) येथे दहावीत विद्यार्थ्याने वर्गातील फॅनला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सिद्धेश सतीश भोईटे (वय १६) असे मृताचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी ९ च्या दरम्यान घडली. हाता-तोंडाला आलेल्या तरुण मुलांची या महिन्याभरातील तिसरी घटना मनाला चटका लावणारी आहे. त्यामुळे पालकांतून चिंता व्यक्त केली जात आहे.

याअगोदर गोटखिंडीतील महाविद्यालयीन विद्यार्थी विशाल बाळासाहेब थोरात याने आत्महत्या केली होती. सौरभ दगडू येवले हा तरुण रायगड पोस्ट मास्तर नोकरी करीत होता. त्याने आत्महत्या केली आहे.

सिद्धेश भोईटे हा येथील गोटखिंडी विद्यालयात दहावीत शिक्षण घेत होता. सोमवारी शाळेच्या पहिल्या मजल्यावर वर्ग सुरू होता. सिद्धेश सकाळी शाळेत आला, यानंतर मी लगेच परत येतो, असे मित्रांना सांगितले व दप्तर तेथेच ठेवून निघून गेला. काही वेळाने मित्रांनी घरी जाऊन चौकशी केली असता तो तिथेही नव्हता. नंतर त्यांनी शाळेत येऊन पाहिले असता, जिथे वर्ग सुरू होता, त्याच्या बाजूच्या वर्गाला आतून कडी होती. शंका आल्याने बाहेरून आवाज दिला; पण दरवाजा उघडत नाही. नंतर दरवाजा जोरात धक्का मारून उघडून पाहिले असता सिद्धेशने वर्गातील फॅनला दोरीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. याबाबत आष्टा पोलिसात त्यांचे नातलग कृष्णात भोईटे यांनी फिर्याद दिली. पोलीस अशोक जाधव पुढील तपास करीत आहेत. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

चाैकट

मी दूर जाणार आहे

सिद्धेश भोईटे याने रविवारी सायंकाळी आपले मोबाइलवर मी दूर जाणार आहे, तुम्हाला माझी आठवण येईल अशा आशयाचा स्टेट‌्स ठेवलेला होता, आज सकाळी तर त्याने आत्महत्या केल्याने उपस्थित मुलांतून स्टेट‌्सबाबत चर्चा सुरू होती.

Web Title: Suicide of a 10th standard student at a school in Gotkhindi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.