शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सुहेल शर्मा यांचीही विजयी सलामी! सांगली महापालिका निवडणूक : अनुचित प्रकार, मारामारीला आळा; शांततेत प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 00:00 IST

महिन्याभरापासून सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीचे वादळ अखेर शुक्रवारी शांत झाले. या निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था उत्तम राखण्यात आली.

सचिन लाड ।सांगली : महिन्याभरापासून सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीचे वादळ अखेर शुक्रवारी शांत झाले. या निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था उत्तम राखण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी निवडणुकीतून विजयी सलामी दिली आहे. ‘बेसिंग पोलिसिंग’वर भर देऊन काम केल्याने निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.शर्मा यांनी तीन महिन्यांपूर्वीच निवडणुकीच्या अनुषंगाने बॅटिंग सुरूकेली होती.

तडीपार, स्थानबद्ध, मोक्का या कारवाईचे चौकार आणि षटकार ठोकले. अवैध धंदेवाल्यांना जम बसवू दिला नाही. प्रतिबंधात्मक कारवाईभर दिला. गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबविली. ‘कोम्बिंग आॅपरेशन’, ‘आॅलआऊट’ मोहीम यासारखे प्रयोग केले. या कारवाईचा गुन्हेगारांनी धसका घेतला. पोलीस कारवाईचा ससेमीरा टाळण्यासाठी अनेक गुन्हेगार पडद्याआड गेले. आचारसंहिता लागताच शर्मा यांनी शहरात येणाºया प्रत्येक मार्गावर नाकाबंदीचे पॉर्इंट लावले. या पॉर्इंटवर पोलीस चौक्या उभ्या केल्या. दारूच्या नशेत वाहन चालविणारे तळीराम तर सायंकाळी सातनंतर रस्त्यावर दिसत नव्हते. रात्री नऊनंतर शहर चिडीचूप होत असे.

महापालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडली. निकालानंतरही अनुचित प्रकार घडला नाही. कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी सोडली, तर मारामारी अथवा वादावादीचे प्रकार घडले नाहीत. शर्मा यांनी कारवाईबाबत घेतलेला आक्रमक पवित्रा आणि त्यांच्या शिस्तबद्धतेपुढे सर्वांना झुकावे लागले. शर्मा यांच्या प्रत्येक आदेशाचे काटेकोरपणे पालन केल्यामुळे अधिकाºयांचीही धावपळ झाली नाही. शहर शांत ठेवण्यासाठी शर्मा व त्यांच्या ‘टीम’ने कारवाईत सातत्य ठेवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.खडतर काळात सूत्रेपदाची सूत्रे हाती घेऊन सुहेल शर्मा यांना अजून वर्षही पूर्ण झालेले नाही. पोलीस कोठडीत अनिकेत कोथळे खून प्रकरण घडले आणि शर्मा यांच्याकडे जिल्ह्याची सूत्रे आली. तो काळ आव्हानात्मक होता. पोलीस दलाचे खच्चीकरण झाले होते. गुन्ह्यांचा आलेख वाढला होता. घरफोडी, चोरी, चेनस्नॅचिंग या गुन्ह्यांनी कळस गाठला होता. पोलिसांच्या असहायतेचा गुन्हेगारांनी गैरफायदा घेतला. पुढे महापालिकेची निवडणूक येऊन ठेपली होती. अशा स्थितीत शर्मा यांनी शिस्तबद्ध काम केले.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूकPoliceपोलिस