शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळा वाढू लागला की सांगलीकरांना शुगरकिंग’ कलिंगडाची भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 19:20 IST

बाजार समितीच्या आवारात सांगली जिल्'ातील वाळवा, मिरज, पलूस, कडेगाव या तालुक्यांसह कोल्हापूर जिल्'ातील शिरोळ तालुक्यातून, सोलापूर, गुलबर्गा, अक्कलकोट आणि कर्नाटक सीमा भागातून कलिंगडाची आवक सुरू आहे.

ठळक मुद्देपन्नास टन आवक : डझनाला ६० ते ५०० रुपये दर

सांगली : उन्हाळ्याची चाहूल लागल्याने गारवा देणारी कलिंगडे बाजारात मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहेत. सांगलीतील विष्णुअण्णा पाटील फळ मार्केटमध्ये शुक्रवारी ५० टन कलिंगडाची आवक झाली आहे. सध्या दररोज १० गाड्यांमधून कलिंगडाची आवक होऊ लागली आहे. गडद हिरव्या रंगाच्या ‘शुगर किंग’ या वाणाच्या कलिंगडाने सांगलीकरांना भुरळ घातली आहे. डझनाचा दर ६० ते ५०० रुपये असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.उन्हाळा वाढू लागला की बाजारात कलिंगडाला मागणी वाढते. शुक्रवारी महाशिवरात्रीनिमित्त उपवासासाठी कलिंगडाला चांगली मागणी होती. येथील विष्णुअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात आवक वाढली आहे.

गुरुवारी १०० टन, तर शुक्रवारी जवळपास ५० टन आवक झाली असून, डझनाला ६० ते ५०० रुपये असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सहायक सचिव चंद्रकांत सरडे यांनी दिली. बाजार समितीच्या आवारात सांगली जिल्'ातील वाळवा, मिरज, पलूस, कडेगाव या तालुक्यांसह कोल्हापूर जिल्'ातील शिरोळ तालुक्यातून, सोलापूर, गुलबर्गा, अक्कलकोट आणि कर्नाटक सीमा भागातून कलिंगडाची आवक सुरू आहे. वाढत्या उन्हामुळे कलिंगडाला मागणीही वाढली आहे. गडद हिरव्या रंगाची कलिंगडे ‘शुगर किंग’ नावाने ओळखली जातात. नावाप्रमाणे त्याला गोडवा अधिक आहे. सांगलीतील विष्णुअण्णा पाटील फळ मार्केटमध्ये एकूण कलिंगडाच्या आवकेमध्ये ८० टक्के ‘शुगर किंग’ जातीची आवक झाली आहे.

‘नामधारी’ जातीच्या म्हणजे फिकट हिरवे पट्टे असणाºया लांबट आणि आकाराने मोठ्या असणाºया कलिंगडांची आवक कमी आहे. फ्रूट सॅलड आणि ज्युस बनवण्यासाठी कलिंगडाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. सध्या आवक मोठ्या प्रमाणात असल्याने किरकोळ बाजारात ‘शुगर किंग’ जातीचे फळ ४० ते ७०, तर नामधारी ३० ते ६० रुपये नग अशी विक्री होत आहे.आवक कमी, दर तेजीतउन्हाळ्याची चाहूल लागल्याने आणि महाशिवरात्रीच्या उपवासासाठी शुक्रवारी फळांना मागणी जास्त होती. त्यातही कलिंगडाचा क्रमांक वरचा होता. पण विष्णुअण्णा पाटील फळ मार्केटमध्ये केवळ ३० टन आवक झाली. आवक अत्यंत कमी झाल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनी प्रतिनग ४० ते ७० रुपये दराने विक्री केली. दर तेजीत असल्याचे होलसेल फ्रूट असोसिएशनचे अध्यक्ष सागर मदने यांनी सांगितले.

 

टॅग्स :Sangliसांगलीfruitsफळे