शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

उसाला ५००० रुपये दर मिळाल्याशिवाय स्वस्थ राहणार नाही - राजू शेट्टी

By संतोष भिसे | Updated: October 12, 2023 16:52 IST

द्राक्ष बेदाणा महामंडळाची मागणी

सांगली : ऊसाला प्रतिटन पाच हजार रुपये आणि दुधाला प्रतिलिटर ६० रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे. यासाठी साखर सम्राटांना आणि दूध सम्राटांना झुकविल्याशिवाय राहणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. सांगलीत गुरुवारी जन आक्रोश पदयात्रेवेळी ते बोलत होते.सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर श्रीफळ वाढवून पदयात्रेचा प्रारंभ झाला. तेथून गणपती मंदिरासमोर साकडे घालण्यात आले. तेथून पदयात्रा मिरजेकडे रवाना झाली. खासदार शेट्टी म्हणाले, शेतकऱ्याच्या घामाच्या प्रत्येक थेंबाचा मोबदला मिळाला पाहिजे. त्याच्या कष्टावर साखरसम्राटांचा चैनी करु देणार नाही. यंदाच्या साखर हंगामात वजन काटे ऑनलाईन केल्याशिवाय कारखान्याला ऊस घालणार नाही.स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, ऊसाचा उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे, पण त्यानुसार दर देण्यास कारखानदार तयार नाहीत. पण स्वाभिमानी संघटना कारखानदारांकडून दर मिळविल्याशिवाय राहणार नाही. पदयात्रेत संदीप राजोबा, भरत चौगुले, बाबा सांद्रे, जगन्नाथ भोसले, पोपट मोरे, संजय बेले, भागवत जाधव, बाळासाहेब लिंबीकाई, श्रीधर उदगावे आदी सहभागी झाले.द्राक्ष बेदाणा महामंडळाची मागणीस्वाभिमानीच्या मागण्या अशा : ऊस तोडीसाठी पैशांची वसुली थांबवा, साखर उताऱ्यातील चोरी थांबवा, द्राक्ष बेदाणा महामंडळ स्थापन करा, त्यांच्या खप वाढीसाठी जाहिराती सुरू करा, दलालाची नोंदणी करुन अनामत घ्या, दुधाला हमीभाव लागू करा, डाळिंब आणि द्राक्ष प्रक्रिया उद्योग सुरू करा.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेmilkदूधRaju Shettyराजू शेट्टी