शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Accident: टेम्पोने चिरडल्याने ऊसतोड मजुराच्या मुलीचा मृत्यू, मजुराचे कुटुंब धुळ्याचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 15:48 IST

उसाच्या शेताकडेला रस्त्यावर खेळत होती

सांगली : उसाच्या शेताकडेला रस्त्यावर खेळणाऱ्या ऊसतोड मजुराच्या मुलीचा वाहनाखाली चिरडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. २७) सायंकाळी पाच वाजता पद्माळे (ता. मिरज) येथे घडली.दिदी अनिल पवार (वय १ वर्ष, मूळ गाव - चॉंदतारा गल्ली, साखरी, जि. धुळे. सध्या रा. मौजे डिग्रज, ता. मिरज) असे चिमुकल्या बालिकेचे नाव आहे. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात वाहन चालक कैलास प्रकाश रोकडे (वय ३५, रा. बहे, ता. वाळवा) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. मुलीचे वडील अनिल प्रवीण पवार यांनी फिर्याद नोंदविली. दीदी शेतात झाडाखाली खेळत असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहू चारचाकीने तिला धडक दिली. त्यातच तिचा मृत्यू झाला. पद्माळेमध्ये आकाश तानाजी जाधव यांच्या गट क्रमांक ४७ या शेतात अनिल पवार आणि त्यांची पत्नी योगिता हे ऊसतोडीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांची तीन मुले गुड्डू, आदी आणि दिदी हे ऊसतोड करणाऱ्या अन्य कामगारांच्या मुलांसोबत शेताच्या कडेला नारळाच्या झाडाखाली खेळत होते. पाच वाजण्याच्या सुमारास कैलास रोकडे हा चारचाकी (एमएच १३ एएक्स ७६६६) भरधाव वेगाने तेथून चालवत निघाला होता. त्यामध्ये उसाचे वाडे भरले होते. वाहनाने शेताकडेला खेळत असलेल्या दिदीला धडक दिली. त्यात ती गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांनी कैलास विरोधात भारतीय न्याय संहिता १०६(१), २८१, १२५(ब) व वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंदविला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Accident: Sugarcane worker's daughter dies after being hit by tempo.

Web Summary : In Sangli, a sugarcane worker's one-year-old daughter died after being hit by a tempo while playing near a field in Padmale. The driver has been arrested. The family is from Dhule.