आष्टा : आष्टा-बागणी मार्गावरील ऋषिकेश जोशी यांच्या मळ्यातील दीड एकर उसाला रविवारी दुपारी १२ च्या दरम्यान शॉर्टसर्किटने आग लागली. आगीत सुमारे ३ ते ४ लाखांचे नुकसान झाले.
ऋषिकेश जोशी यांचे शेत राजारामबापू बँकेचे संचालक अनिल गायकवाड (रा. मिरजवाडी, ता. वाळवा) यांनी वाटणीने केले आहे. रविवारी दुपारी अचानक या शेतातील उभ्या उसाला शॉर्टसर्किटने आग लागली. अनिल गायकवाड, नगरसेवक दीपक मेथे, विजय मोरे, प्रभाकर जाधव, सुनील माने, जिल्हा बँकेचे माजी संचालक दिलीप वग्यानी, सुहास मेथे, अमित गायकवाड यांच्यासह आष्टा नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाचे सचिन मोरे, लखन लोंढे व शेतकऱ्यांनी तातडीने आग आटाेक्यात आणली.
महावितरणचे अधिकारी विजय पवार यांच्यासह कोतवाल बबलू नायकवडी घटनास्थळी उपस्थित होते. आगीत तीन ते चार लाखांचे नुकसान झाले आहे.