शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

'अंश' बनण्यासाठी कडेगावच्या 'अश्विनी'ची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 11:13 IST

लिंग परिवर्तनाच्या या धाडसी निर्णयाला त्यांच्या कुटुंबियांनी पाठींबा दिला आणि परिवर्तनाची नवी दिशा समाजाला दिली आहे.

प्रताप महाडीककडेगाव : कडेगाव तालुक्यातील तोंडोली येथील अश्विनी खलिपे दिल्ली येथील सर गंगाराम रुग्णालयात लिंग बदल करण्यासाठी उपचार घेत आहेत. त्यांच्यावर पहिल्या टप्प्याची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आता 'अश्विनी'चे नाव  बदलून 'अंश' असे करण्यात आले आहे.अश्विनी खलिपे या २८ वर्षीय तरुणीने लिंग परिवर्तन करण्याचा मानस बाळगला अणि काही महिन्यांपूर्वी  गॅझेट करून अंश खलिपे हे नाव धारण केले आहे. पहिल्या टप्प्यातील शस्त्रक्रिया १६ मार्च रोजी झाली. आता चार  महिन्यांनी दुसऱ्या टप्प्यातील शस्त्रक्रिया होणार आहे. त्यानंतर तिसरी शस्त्रक्रिया होणार आहे. या तिन्ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर लिंग बदल करण्याचे सर्व उपचार यशस्वीपणे पूर्ण होतील. मागील वर्षभरापासून त्यांना लिंग परिवर्तनाची प्रतीक्षा होती.कोरोना संकटामुळे या शस्त्रक्रियेला थोडासा उशीर  झाला. आता मात्र पहिल्या टप्प्यातील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर दिलासा मिळाला आहे. याशिवाय अंश खलिपे या नावाने समाजात ओळख होत आहे याचाही त्यांना आनंद आहे. लहानपणापासूनच पुरुषाप्रमाणे कृती अश्विनीच्या शारिरीक जडणघडणीतुन दिसुन येत होत्या. करारीपणा, निडरपणा, पोशाख या सर्व बाबतीत पुरुषाप्रमाणे वर्तन होते. लिंग परिवर्तनाच्या या धाडसी निर्णयाला त्यांच्या कुटुंबियांनी पाठींबा दिला आणि परिवर्तनाची नवी दिशा समाजाला दिली आहे.पत्रकारिता आणि सामाजिक कार्यातही नावलौकिकअंश खलिपे यांनी सांगली येथील एन.एस.एस.लॉ कॉलेज मध्ये वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आहे व टिळक विद्यापीठाच्या सांगली शाखेत सध्या पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. पत्रकारिता आणि सामाजिक कार्यातही त्यांनी नावलौकिक मिळविला आहे.बीड जिल्ह्यातील ललित साळवेंचे घेतले मार्गदर्शनयापूर्वी बीड जिल्ह्यातील पोलीस शिपाई ललिता साळवे यांच्यावर लिंग बदल शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. त्यांना आता ललित साळवे या नावाने ओळखले जाते. त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अंश खलीपे यांनी मार्गदर्शन घेतले. समाजातील दबलेल्या असंख्य तरुण-तरुणींसाठी खलिपे यांचा लिंग परिवर्तनाचा यशस्वी प्रयोग दिशादर्शक ठरणार आहे. पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर अंश खलिपे आता कडेगाव येथील घरी विश्रांती घेत आहे. लवकरच अंश खलिपे हा एक  पत्रकार, वकील आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून नव्या ऊर्जेने कार्यरत होणार आहे.

कुटुंबीय व समाजातून प्रोत्साहन  मला आई, वडील, भाऊ,वहिनी  तसेच कुटुंबिय आणि समाजातील चांगल्या लोकांकडुन उर्जा व शक्ती मिळाली. तसेच माझ्या कार्यक्षेत्रात काम करणारे  सहकारी  व मित्रमैत्रीणींकडुन  मोलाची साथ व प्रोत्साहन मिळाले. यामुळे हा निर्णय घेणे मला सोपे झाल्याचे अंश खलिपे (पूर्वीचे नाव : अश्विनी खलीपे)ने सांगितले.

टॅग्स :Sangliसांगली