शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Success Story : युपीएससीत पाच वेळा हुलकावणी, पण एमपीएससीत सांगलीच्या पठ्ठ्यानं पटकावला पहिला क्रमांक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 10:20 IST

राज्यसेवा परीक्षेत राज्यात पहिला आलेल्या प्रमोद चौगुलेच्या पराक्रमाची गोष्ट

संतोष भिसेसांगली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाने प्रमोद चौगुलेला पाचवेळा हुलकावणी दिली; पण त्याने जिद्द कायम ठेवत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत थेट राज्यात पहिला येण्याचा पराक्रम केला. त्याच्या यशाने आभाळ ठेंगणे झालेले चौगुले कुटुंबीय शनिवारी दिवसभर गुलाल अन् कौतुकाच्या वर्षावात न्हाऊन निघाले होते. सांगलीत शनिवारी शामरावनगरमधील प्रमोदच्या घरात दिवाळीचे वातावरण होते. घरभर हारतुरे, बुके आणि मिठाईंचे बॉक्स भरले होते. अतिवरिष्ठ अधिकारी पदाच्या वेशीवर पाऊल ठेवल्यानंतर त्याच्या अभिनंदनासाठी अनेक राजपत्रित अधिकारी घरी येऊन गेले. एमपीएससीतील अद्वितीय यशाचा आनंद प्रमोदने साधेपणाने साजरा केला. ‘लोकमत’शी संवाद साधतानाही गेल्या पाच-सात वर्षांतील कष्टाचे प्रतिबिंब चेहऱ्यावर जाणवत होते. तो म्हणाला, ‘यूपीएससीच्या परीक्षेत पाचवेळा अपयश आले, मर्यादा संपल्यानंतर नाद सोडला, पण त्याचा फायदा राज्य सेवा परीक्षेसाठी झाला. पाया पक्का झाला. मुलाखतीपर्यंत आत्मविश्वास कायम राहिला.’ ‘घरची जबाबदारी अभियंता पत्नी प्रेरणाने सांभाळली. ती पुण्यात नोकरीस असल्याने मला अभ्यासावर लक्ष केंद्रित करता आले. यादरम्यान, मी देखील अर्थार्जनासाठी काही दिवस मुलांना शिकविण्याचे काम केले. प्रेरणाचा भाऊ प्रदीपही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता. गतवर्षी यशस्वी ठरला. सध्या उपजिल्हाधिकारी पदाचे प्रशिक्षण घेतोय. मला मात्र एका गुणाने यशाने हुलकावणी दिली. त्याची कसर यावर्षी भरून काढली. यशाची खात्री होती; पण राज्यात पहिल्या क्रमांकाने बाजी मारण्याची भावना नव्हती. पसंतीक्रम ९ मेपर्यंत कळवायचा आहे. यादरम्यान आणखी एक मुख्य परीक्षा देत आहे. त्यातही यशाने साथ दिली, तर उपजिल्हाधिकारी दर्जाचे पद मिळू शकेल. या वाटचालीत वडील बाळासाहेब, आई शारदा, भाऊ आकाश यांची साथ मिळाल्याचे प्रमोदने सांगितले.

सोनीमध्ये मिरवणूकसोनी या त्यांच्या मूळ गावीही जल्लोष आणि आतषबाजी झाली. अभिनंदनासाठी गावकऱ्यांची दिवसभर रीघ होती. सायंकाळी संपूर्ण चौगुले कुटुंबीयांची सोनीकरांनी जल्लोषात सवाद्य मिरवणूक काढली. प्रमोदने सोनीचे नाव राज्यात चमकविल्याचा अभिमान गावकऱ्यांच्या मनात होता.

टॅग्स :Sangliसांगलीupscकेंद्रीय लोकसेवा आयोगMPSC examएमपीएससी परीक्षा