शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: ‘चंदा-सेनापती’च्या संसारात नवा ट्विस्ट; सह्याद्रीत ‘सुभेदार’ परतला, वर्चस्वाचा संघर्ष पेटणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 17:46 IST

राधानगरी ते चांदोली २५० किमीचा थरारक प्रवास

विकास शहाशिराळा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पमध्ये वन्यजीव प्रेमींसाठी एक अत्यंत आनंदाची आणि कुतूहलाची बातमी समोर आली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील डॅशिंग नर वाघ ‘सुभेदार’ याने अवघ्या दीड महिन्यात राधानगरी ते चांदोली असा तब्बल २५० किलोमीटरचा प्रवास करून अभ्यासकांना चकित केले आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!चांदोली आणि राधानगरी यामधील सरळरेषेतील अंतर १०० किमी असले तरी, वाघाचा नैसर्गिक वावर आणि जंगलातील अडथळे पार करत सुभेदारने सुमारे २५० किमीचा प्रवास केला आहे. जानेवारीमध्ये सुभेदार राधानगरी अभयारण्यात कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाला होता. महिनाभर राधानगरीत मुक्काम ठोकल्यानंतर त्याने पुन्हा आपल्या मूळ अधिवासाकडे म्हणजे सह्याद्रीकडे कूच केली. त्याच्या अंगावरील पट्टेरी रचनेवरून (STR-T) त्याची ओळख निश्चित करण्यात आली आहे.एकीकडे सुभेदारच्या प्रवासाची चर्चा आहे, तर दुसरीकडे चांदोलीत ‘चंदा’ आणि ‘सेनापती’ यांच्या केमिस्ट्रीची चर्चा रंगली आहे. ताडोबातून आलेल्या ‘चंदा’ने (STR-०४) चांदोलीत स्वतःची हद्द निर्माण केली आहे. अलीकडेच ती आणि ‘सेनापती’ (STR-०१) महिनाभर एकत्र वावरताना दिसले होते. कॅमेरा ट्रॅपमधील फुटेजमध्ये सेनापतींच्या मागोमाग चंदा जाताना दिसली आहे. वन्यजीव विभागाच्या मते, त्यांच्यात मिलन झाले असण्याची दाट शक्यता असून, चंदाच्या शारीरिक स्थितीत होत असलेल्या बदलांमुळे सह्याद्रीत लवकरच ‘नव्या पाहुण्यांचे’ आगमन होऊ शकते.सुभेदारचा रंजक इतिहाससुभेदार हा मूळचा राधानगरीचाच रहिवासी आहे. दि. २३ एप्रिल २०२२ रोजी तो पहिल्यांदा तिथे दिसला होता. त्यानंतर दोन वर्षे तिथेच राहिल्यावर दि. २८ ऑक्टोबर २०२४ ला त्याने पहिल्यांदा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात हजेरी लावली होती. आता पुन्हा तो आपल्या जुन्या क्षेत्रात परतल्याने वन्यजीव विभागात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.चांदोलीत वर्चस्वाचा संघर्ष पेटणार का?सेनापती आणि चंदा यांच्या मिलनानंतर आता ‘सुभेदार’च्या परतण्याने या व्याघ्र क्षेत्रात वर्चस्वाचा संघर्ष होणार की सुभेदार आपली वेगळी हद्द निर्माण करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Tiger 'Subhedar' returns, challenging 'Chanda-Senapati' pair's territory?

Web Summary : Tiger 'Subhedar's' return to Sahyadri after a 250km journey sparks territorial concerns. 'Chanda' and 'Senapati' are already establishing dominance, potentially leading to conflict or new boundaries.