लोकमत न्यूज नेटवर्क
पुनवत : जिल्ह्यातील पुनवत व सातारा जिल्ह्यातील अनेक युवकांच्या पुढाकाराने परदेशात विविध ठिकाणी जहाजावर बसवलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्त्यांचे पारंपरिक पद्धतीने थाटात विसर्जन करण्यात आले. विसर्जनाच्या मिरवणुका जहाजाच्या डेकवर काढण्यात आल्या.
पुनवत येथील विजय वरेकर, जितेंद्र जाधव, प्रवीण पाटील, सुनिल कदम, रमेश जाधव, शिवाजी उपलाने, विजय पाटील, रविकिरण खोत, तानाजी यादव यांच्यासह सातारा जिल्ह्यातील मराठमोळ्या युवकांनी परदेशात पिवळा समुद्र, चीन जवळ दोंगजियाकाऊ, हिंदी महासागर व अटलांटिक महासागरात प्रवासात असणाऱ्या जहाजावर गणेशोत्सव साजरा केला. या उत्सवात कॅप्टन अभि निश्चय, मुख्य अभियंता खान अब्दुल महंमद (बांगलादेश), मुख्य अधिकारी हसन, बग्लोडी प्रजवाल, जेस्सा(इथोपिया), अनिल काळे, संभाजी चांदणे, बाळासाहेब मांडवे, प्रजेश कुमारन, राममूर्ती बालानी, भूपती प्रशांत, कुमार आशिष, सोहल ज्योत सिंग, मनीष कुमार, मोहतासीम, सत्यप्रकाश यादव आदी देशी व परदेशी नागरिकांनी सहभाग घेतला.
जहाजावरील प्रवासात डेकवर पारंपरिक पध्दतीने मिरवणूक काढून समुद्रात मूर्त्यांची विसर्जन करण्यात आले.
160921\1627-img-20210915-wa0002.jpg
फोटो - अटलांटिक महासागरातील जहाजावर गणपती विसर्जन कार्यक्रमात सहभागी देशी आणि परदेशी नागरिक