शहरं
Join us  
Trending Stories
1
पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच भाजपाने तीन ठिकाणी उधळला गुलाल
2
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
3
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
4
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
5
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
6
सावधान! ChatGPT वर तुमची माहिती गुप्तपणे सेव्ह होते; टाळायचे असेल तर या ५ स्टेप्स फॉलो करा
7
अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...?
8
VHT 2025 : महाराष्ट्र संघासाठी 'संकटमोचक' ठरला ऋतुराज! शतकी खेळीसह टीम इंडियातील जागेवरही टाकला रुमाल
9
झटपट, पटापट! स्मार्टफोन, इंटरनेट नसेल तरी नो टेन्शन; 'हा' नंबर डायल, काही सेकंदात UPI पेमेंट
10
“राज ठाकरेंच्या जास्त जागा जिंकून याव्यात ही आमची इच्छा, आम्ही बहुमत मिळवू”: संजय राऊत
11
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
12
नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर
13
Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ
14
'ताज'चे नाव आता 'जीव्हीके' हॉटेल्सवरून हटणार; टाटा समुहाने संपूर्ण हिस्सा विकला, कोण आहे खरेदीदार?
15
बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...
16
जिभेचे चोचले की निसर्गाचा चमत्कार? जगातला असा एकमेव बेट, जिथे चक्क माती खातात लोक!
17
"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात
18
एबी फॉर्म दिला, जल्लोष झाला अन् तासाभरात उमेदवारी रद्द
19
संप सुरू होण्यापूर्वी Swiggy, Zomato बॅकफुटवर; डिलिव्हरी बॉईजसाठी आली चांगली बातमी
20
पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय प्रवेशाचे गणित यावर्षी बदलणार, ‘कट ऑफ’बाबत बांधले जातायत अंदाज 

By अविनाश कोळी | Updated: June 28, 2025 19:16 IST

यंदा सहाशे पार केवळ १,३३२ 

अविनाश कोळीसांगली : वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या राष्ट्रीय पात्रता वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आता प्रवेश प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजून कोणतीही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली नसली तरी विद्यार्थी आणि पालकांमध्ये वैद्यकीय प्रवेशासाठीचा कट ऑफ किती राहील, याबाबत अंदाज बांधले जात आहेत. यंदाच्या निकालात पाचशेहून अधिक गुण मिळविणाऱ्यांची संख्या ५९ हजार ५०३ इतकी आहे. त्यामुळे वैद्यकीय प्रवेशाचे चित्र मागील वर्षीपेक्षा प्रचंड भिन्न राहील.यंदा तुलनेने गेल्या कित्येक वर्षात सर्वाधिक कठीण पेपर आल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. कमी गुणांमुळे आपल्याला वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळेल की नाही, याची भीती विद्यार्थी आणि पालकांना वाटत होती. मात्र, सर्वच विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांची ऑल इंडिया रँक कमी गुण असूनही चांगली आली आहे.यावर्षी पहिल्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यालाच ६८६ गुण मिळाले आहेत. यावर्षी ५००हून अधिक गुण मिळवणारे देशभरात फक्त ५९ हजार ५०३ विद्यार्थी असल्यामुळे यंदा वैद्यकीय प्रवेशाचा कटऑफ मोठ्या प्रमाणात खाली येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गुणनिहाय विद्यार्थी संख्यागुण  - विद्यार्थी१४४-२००  - ३,०३,०४०२०१-२५०  - १,९८,३४६२५१-३०० -  १५७,९५२३०१-३५० -  १,२६,९३५३५१-४०० -  १,०५,५७८४०१-४५० -  ८८,२३९४५१-५०० -  ६९,५०३५०१-५५० -  ३९,५२१५५१-६०० -  १०,६५८६०१-६५० -  १२५९६५१-६८६  -  ७३

गतवर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांची ऑल इंडिया रँक चांगली आली असल्यामुळे ऑल इंडिया कौन्सिलिंगचा कट ऑफ कमी येणार आहे. महाराष्ट्रातील प्रवेशासाठी महाराष्ट्रातील गुणवत्ता यादीतील क्रमांक (स्टेट मेरिट लिस्ट) आणि महाराष्ट्रातील कॅटेगरी क्रमांक किती आहे, हे महत्त्वाचे आहे. तरीही गतवर्षीपेक्षा खूप कमी गुणांना महाराष्ट्रात प्रवेश मिळण्याची संधी आहे.  - डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समुपदेशक, सांगली