शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: मिरजेत शासकीय तंत्रनिकेतन वसतिगृहात विद्यार्थिनीची आत्महत्या, कारण अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 12:24 IST

शवविच्छेदन करून रात्री उशिरा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला

मिरज : मिरजेत शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वसतिगृहात श्रेया संतोष फडतरे (वय १९, रा. वडूज, जि. सातारा) या विद्यार्थिनीने खोलीत ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत गांधी चौक पोलिसांत नोंद आहे.मिरजेत शासकीय तंत्रनिकेतनध्ये तिसऱ्या वर्षात मेकॅनिकलचे शिक्षण घेणार्या श्रेया फडतरे हिने गुरुवारी दुपारी वसतिगृहातील खोलीत पंख्याला ओढणीने गळफास लावला. ही बाब तिच्या मैत्रिणींच्या निदर्शनास आल्याने तिचा गळफास काढून श्रेयाला खाली उतरवण्यात आले. महाविद्यालय प्रशासनाने तिला तातडीने उपचारासाठी मिरज सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान श्रेया फडतरेचा मृत्यू झाला. श्रेयाच्या आत्महत्येची घटना समजल्यानंतर तिच्या नातेवाइकांनी मिरजेत धाव घेतली. घडलेली घटनेबाबत महाविद्यालय प्रशासनाने लवकर माहिती दिली नसल्याने नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. तिचे शवविच्छेदन करून रात्री उशिरा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबत गांधी चौक पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरज