शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Tariff Effect: मिरजेची सतार अमेरिकेत लाखाच्या घरात, निर्यात घसरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 13:49 IST

गेल्या तीन महिन्यांपासून तंतुवाद्यांची मागणी थांबली

सदानंद औंधेमिरज : ‘तंतुवाद्यांचे मोहरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरजेत तयार होणाऱ्या दर्जेदार तंतुवाद्यांना अमेरिकेच्या वाढीव टेरिफचा मोठा फटका बसला आहे. अमेरिकेत ५० टक्के आयात कर लावल्याने मिरजेतून होणारी सतार व तांबोऱ्यांची निर्यात केवळ १ ते २ टक्क्यांवर आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून तंतुवाद्यांची मागणी जवळपास थांबली आहे.पूर्वी अमेरिकेत ७० हजार रुपयांपर्यंत उपलब्ध होणारी मिरजेची सतार व तंबोऱ्यांची किंमत आता टेरिफमुळे लाखाच्या घरात पोहोचली आहे. किंमत वाढल्याने अमेरिकेन ग्राहकांची मागणी घटली आहे. निर्यातदार व वाद्य व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसला आहे. मिरजेतून दरमहा सुमारे ४० सतार व तांबोरे अमेरिकेत पाठविले जात होते. अमेरिकेत भारतीयांची संख्या जास्त असल्याने तिथे तंतुवाद्यांसाठी मोठा ग्राहकवर्ग आहे. मात्र ५० टक्के टेरिफ लागू झाल्यानंतर मागणी एकदम कोसळली असून, पूर्वी दिलेल्या ऑर्डरही अनेकांनी रद्द केल्या किंवा थांबविल्या आहेत. मिरजेत तंतुवाद्य व्यवसाय दीडशे वर्षांची परंपरा असून जगभरात येथे तयार होणाऱ्या वाद्यांची ख्याती आहे. दरवर्षी शेकडो वाद्ये अमेरिका, युरोपसह अनेक देशांमध्ये निर्यात होतात. कुरिअर व पोस्टाद्वारे ही वाद्ये विदेशात पाठविली जातात. मात्र गेल्या तीन महिन्यांत अमेरिकेत निर्यात होणारी वाद्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतकी राहिली आहेत.

निर्यातीचा खर्चही वाढलाआता तंतुवाद्ये कुरिअरद्वारे अमेरिकेत पाठविण्यापूर्वी टेरिफ भरावे लागत असल्याने खर्चही वाढला आहे. याचा तंतुवाद्य निर्मात्यांना आर्थिक फटका बसला आहे.

व्यावसायिकांची केंद्र शासनाकडून अपेक्षाअमेरिकन टेरिफचा मिरजेतील तंतुवाद्य उद्योगाला तडाखा बसला असून, मिरजेतील व्यावसायिक केंद्र सरकारकडून व्यापार कराराद्वारे उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत.

गेल्या तीन महिन्यांपासून अमेरिकेतून एकही नवीन ऑर्डर येत नाही. पाठवण्यापूर्वी कर भरावा लागतो. भारत-अमेरिका व्यापार करारातून तोडगा निघेल, अशी आम्ही अपेक्षा करतो. टेरिफ कायम राहिल्यास तंतुवाद्य व्यवसाय संकटात येणार आहे. - मोहसीन मिरजकर, तंतुवाद्य निर्माते, मिरज

English
हिंदी सारांश
Web Title : Miraj Sitar Exports Plunge as US Tariffs Hit Hard

Web Summary : US tariffs devastate Miraj's sitar industry. Exports plummeted due to 50% import tax. Prices soared, demand crashed, affecting artisans. Trade deal sought.