शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

‘गल्ल्यांना किल्ल्यांची नावे’; सांगली जिल्ह्यातील 'ही' ग्रामपंचायत राबवतेय आदर्शवत उपक्रम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 16:19 IST

समाजापुढे एक सकारात्मक व विधायक बदलाचा संदेश

शिराळा : शिरसी (ता. शिराळा) ग्रामपंचायतीने पुरोगामी महाराष्ट्रात एका ऐतिहासिक निर्णयातून समाज व्यवस्थेत रूढ असलेली अक्षररूपी जातीव्यवस्था मोडून एक जात व्यवस्थेला छेद देणारा निर्णय घेतलेला आहे.सरपंच स्मिता भोसले, सर्व सदस्य, ग्रामस्थ यांनी महाराष्ट्रातले वैभव, महाराष्ट्राची परंपरा व स्वराज्यातील इतिहासाचे साक्षीदार गडकोट किल्ले यांच्याप्रति जाणीव, जागृती व व्याप्ती तसेच नव्या पिढीला किल्ल्यांविषयी आकर्षण निर्माण होण्याकरिता ‘गल्ल्यांना किल्ल्यांची नावे’ देऊन समाजापुढे एक सकारात्मक व विधायक बदलाचा संदेश संपूर्ण महाराष्ट्राला दिलेला आहे.नव्या पिढीला किल्ल्यांविषयी आकर्षण निर्माण होण्याकरिता गावातील जातीव्यवस्थेवर आधारित असलेल्या ‘गल्ल्यांना किल्ल्यांची नावे’ देऊन फलक लावले आहेत. यातून गडकोट व किल्ल्यांविषयी नव्या पिढीला माहिती व्हावी, किल्ल्यांविषयी आत्मियता वाढावी, किल्ल्याचे बांधकाम करताना, रचना करताना जो विचार शिवाजी महाराजांचा होता, तोच दृष्टिकोन ठेवून गावातील तरुणांनी पुढील आयुष्यात प्रगती करताना या किल्ल्यांना स्मरून वाटचाल करण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे.

येथे राबविले जाणारे विविध उपक्रम आदर्शवत ठरत आहेत. सरपंच स्मिता भोसले यांच्याकडून ‘राजमाता जिजाऊ लेक लाडकी’ योजनेच्या माध्यमातून १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत गावात जन्मलेल्या प्रत्येक मुलीच्या नावावर पाच हजार रुपये ठेव ठेवली आहे.

शिरसी शहरातील व ग्रामीण भागातील अनेक गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची नावे जातीवाचक आहेत. ही बाब महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला भूषणावह नसल्यामुळे राज्यात सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने अशा सर्व गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची नावे बदलून अशा जातीवाचक नावांऐवजी किल्ल्यांची नावे दिली आहेत. - स्मिता भोसले, सरपंच,

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायतFortगड