शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

वादळी पावसामुळे सांगलीकरांचे हाल बेहाल

By admin | Updated: June 11, 2016 01:27 IST

३५ झाडे पडली : विद्युत व पाणीपुरवठा खंडित, उपनगरे चिखलात; घरांच्या भिंतीही कोसळल्या

सांगली : शहरात गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने तब्बल ३५ झाडे उन्मळून पडली. त्यामुळे शहराच्या अनेक भागातील विद्युतपुरवठा खंडित झाला होता. त्याचा परिणाम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर झाला असून दिवसभर पाणीपुरवठा खंडित होता. पावसामुळे शामरावनगर, विनायकनगरसह उपनगरे चिखलात रुतली आहेत. झाडे पडल्याने अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. घरांवरील पत्रे उडून गेले असून भिंतीही कोसळल्या आहेत. शेरीनाल्याचे पाणी पुन्हा कृष्णा नदीत मिसळत होते. या पावसाने शहराचे हाल बेहाल झाले आहे. गुरुवारी रात्री शहर आणि परिसराला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. जोरदार वाऱ्यामुळे शहरातील ३५ झाडे उन्मळून पडली, तर अनेक झाडांच्या फांद्या तुटल्या होत्या. खणभाग, स्टेशन चौक, वखार भाग, आपटा पोलिस चौकी परिसरात झाडे पडली होती. महापालिकेच्या अग्निशमन व उद्यान विभागाकडून दिवसभर पडलेली झाडे तोडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू होते. रात्रीपासूनच महापालिकेची यंत्रणा रस्त्यावर उतरली होती. बहुतांश झाडे विजेच्या खांबांवर पडल्याने तारा तुटल्या होत्या. त्यामुळे शहरातील विद्युत पुरवठा गुरुवारी रात्रीपासून खंडित झाला होता. सायंकाळपर्यंत अनेक भागातील विद्युत पुरवठा सुरळीत झालेला नव्हता. अनेक ठिकाणी विद्युत खांबच मोडले होते. महापालिकेच्या कृष्णा नदीवरील जॅकवेलजवळील पाच विद्युत खांब मोडून पडले होते. त्यामुळे शुक्रवारी शहराला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. सकाळपासूनच विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते. स्टेशन चौकातील झाडे तोडून दुपारी तेथून जॅकवेलपर्यंत विजेचा पुरवठा करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी महापालिकेने पाणी उपसा सुरू केला आहे. शनिवारी सकाळी पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, महापालिकेने अनेक भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. पावसामुळे उपनगरे चिखलमय झाली आहेत. शामरावनगर, विनायकनगर, महसूल कॉलनी परिसरात ड्रेनेजचे काम सुरू आहे. ठेकेदाराने माती रस्त्यावर टाकल्याने हा संपूर्ण परिसर चिखलात रुतला होता. महापौर हारूण शिकलगार, आयुक्त खेबूडकर, शहर अभियंता आर. पी. जाधव, आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी सकाळी पाहणी केली. शामरावनगर ते झुलेलाल मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर तातडीने मुरूम टाकण्याचे आदेश दिले आहेत. मिरज शहराच्या काही भागालाही वादळी पावसाचा फटका बसला. (प्रतिनिधी)रात्रभर : अधिकारी, कर्मचारी रस्त्यावररात्री पावसाचा जोर कमी झाल्यानंतर महापालिका व विद्युत विभागाचे कर्मचारी रात्रभर रस्त्यावर उतरले होते. उन्मळून पडलेली झाडे तोडून सकाळपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला, तर काही ठिकाणी विद्युत खांब मोडले होते. त्यावरील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी अथक् प्रयत्न सुरू होते. महापालिकेचे सर्वच अधिकारी, कर्मचारी पहाटेपर्यंत काम करीत होते. सकाळी नऊ वाजता आयुक्त खेबूडकर कार्यालयात आले. त्यांनी आढावा घेऊन अत्यावश्यक ठिकाणी वेगाने काम करण्याची सूचना केली. नगरसेवक प्रशांत मजलेकर यांनी तर खासगी कर्मचारी लावून झाडे तोडून वाहतूक सुरळीत केली.