शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील उपचाराविना मृत्यूच्या घटना थांबवा : संजय विभुते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 15:41 IST

सांगली जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असताना जिल्हा प्रशासनाकडून अपेक्षित काम होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे तातडीने गांभिर्याने पावले उचलून वाढणारे मृत्यू थांबवावेत, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते, आनंदराव पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यातील उपचाराविना मृत्यूच्या घटना थांबवा : संजय विभुतेशिवसेनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सांगली : जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असताना जिल्हा प्रशासनाकडून अपेक्षित काम होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे तातडीने गांभिर्याने पावले उचलून वाढणारे मृत्यू थांबवावेत, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते, आनंदराव पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.जिल्हाप्रमुखांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांना निवेदन दिले. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. त्याचवेळी उपचाराविना मरणाऱ्यांचे प्रमाणही गेल्या काही दिवसात वाढले आहे.

अशा परिस्थितीत प्रशासनाकडून ज्यापद्धतीने निर्णय होणे अपेक्षित आहे त्यापद्धतीने होताना दिसत नाहीत. ग्रामीण भागामध्ये रुग्णांची वेळेत तपासणी होणे, वेळेत अहवाल देणे या गोष्टी होत नसल्याने संक्रमण वाढत आहे. त्यामुणे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.यावर उपाय म्हणून हंगामी तत्वावर डॉक्टर व परिचारिकांची तातडीने भरती करावी. कोविड रु्रग्णांना ६ हजार ५00 रुपयांऐवजी ३ हजार रुपयांमध्ये चाचणी उपलब्ध करून द्यावी. महात्मा फुले योजनेअंतर्गत सर्व जाचक अटी रद्द करून कोरोना रुग्णांना योजनोचा जास्तीत जास्त लाभ कसा मिळवून देता येईल, याविषयी प्रयत्न करावेत.

कोरोनावर उपचार घेण्यासाठी परराज्यातून येत असलेल्या रुग्णांना त्यांच्या राज्यातच परत पाठवण्याबाबत प्रशासनाला सक्त सूचना कराव्यात. कारण जिल्ह्यातील रु्रग्णांना अगोदर बेड मिळत नाहीत आणि त्यातच परराज्यातून रुग्ण आले तर आपल्या जिल्ह्यातील रुग्णांचे हाल होणार आहेत. यावर ठोस उपाययोजना करावी. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये सांगली जिल्ह्यासाठी ५०० बेडचे आॅक्सिजन आणि व्हेंटिलेटर असणारे मोठे कोवीड सेंटर उभारण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी.जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील आणि महापालिका क्षेत्रातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांच्या तालुक्?यातील तहसीलदार, पोलीस, निरीक्षक तालुका आरोग्य अधिकारी आणि इतर सर्व काम करणाऱ्या लोकांची समन्वय समिती स्थापन करावी. कारण जोपर्यंत आपण त्यांच्यावर जबाबदारी देऊन काम करत नाही, समन्वय जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत या बाबतीमध्ये उपाययोजना करणे अवघड होणार आहे. त्यामुळे समन्वय समिती स्थापन करून रोजच्या रोज त्याचा अहवाल आपल्याकडे मागवून घ्यावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याShiv SenaशिवसेनाSangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी