शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

भूसंपादनास विरोधासाठी काँग्रेसचा रास्ता रोको मिरज-पंढरपूर रस्त्यावर वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:32 IST

मिरज : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गास भूसंपादनाला विरोधासाठी काँग्रेस नेते प्रा. सिध्दार्थ जाधव यांच्या नेतृत्वाखाली टाकळी, बोलवाड व मालगाव परिसरातील शेतकऱ्यांनी

ठळक मुद्दे: राष्ट्रीय महामार्गाला विरोध; मिरज - पंढरपूर रस्त्यावर आंदोलन

मिरज : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गास भूसंपादनाला विरोधासाठी काँग्रेस नेते प्रा. सिध्दार्थ जाधव यांच्या नेतृत्वाखाली टाकळी, बोलवाड व मालगाव परिसरातील शेतकऱ्यांनी मिरज-पंढरपूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे पंढरपूर रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. शेतकºयांच्या जनसुनावणीत संमत झाल्याप्रमाणे रत्नागिरी-नागपूर महामार्ग व्हावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आमदार सुरेश खाडे यांनी, शाळेजवळून महामार्ग जावा यासाठी राजकीय वजन वापरून सुमारे १०० मीटर महामार्गात बदल केला आहे. यामुळे मालगाव, सुभाषनगर, टाकळी, बोलवाड येथील शेतकऱ्यांची ५५ घरे, २२ विहिरी, कूपनलिका, जनावरांचे गोठे बाधित होऊन जमीनदोस्त होणार आहेत. यापूर्वी जनसुनावणीमध्ये पाच रस्त्यांचे पर्याय सुचविण्यात आले होते. त्याप्रमाणे पर्याय क्रमांक तीन सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता. यामुळे केवळ दोनच घरे बाधित होऊन क्षारपड व नापीक जमिनीतून महामार्ग जाणार होता. त्यामुळे पर्याय क्रमांक तीनप्रमाणेच महामार्ग करावा, अशी मागणी शेतकºयांनी केली.

काँग्रेस नेते प्रा. सिध्दार्थ जाधव म्हणाले, आ. खाडे सुडाचे राजकारण करीत आहेत. एरंडोलीत रस्ताच नसलेल्या ठिकाणी पूल बांधत आहेत. लोकप्रतिनिधी जनतेचा सेवक असतो, हे आमदारांना माहीत नाही. माजी सभापती अनिल आमटवणे म्हणाले, जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन करणाºयांवर गुन्हे दाखल करून आ. खाडे सुडाचे राजकारण करीत आहेत. मतदार संघात त्यांनी कोणतेही विधायक काम केलेले नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी सतत आंदोलने करताना आम्ही सत्ताधाºयांच्या दबावाला बळी पडणार नाही.

मालगावचे शेतकरी किशोर सावंत म्हणाले, स्वत:च्या फायद्यासाठी आ. खाडे शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत. त्याचा हिशेब येणाऱ्या निवडणुकीत शेतकरी देतील.

नामदेव करगणे म्हणाले, शेतकरीविरोधी भाजप सरकारचे आमदार असल्याने आ. खाडे शेतकºयांच्या विरोधातच आहेत. शेतकºयांनी प्रा. सिध्दार्थ जाधव यांच्या पाठीशी राहावे, असे आवाहन त्यांनी केले.मालगाव, सुभाषनगर, टाकळी, बोलवाड, भोसे, कळंबी, कवठेमहांकाळ पसिरातील शेतकरी आंदोलनात सहभागी होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रास्ता रोकोमुळे सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती.चुकीचे अधिग्रहणमूळ महामार्गाच्या आराखड्याऐवजी चुकीच्या पध्दतीने अधिग्रहण प्रक्रिया सुरू असल्याचा व जमीन अधिग्रहण करताना लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपाने बागायत शेतीतून महामार्ग वळविण्यात आल्याचा आरोप यावेळी प्रा. सिध्दार्थ जाधव यांनी केला.राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादनास विरोधासाठी काँग्रेस नेते प्रा. सिध्दार्थ जाधव यांच्या नेतृत्वाखाली टाकळी, बोलवाड व मालगाव परिसरातील शेतकऱ्यानी मिरज-पंढरपूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.