जत : राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेश शिंदे यांच्या गाडी व बंगल्यावर रविवारी मध्यरात्री अज्ञातांनी दगडफेक केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात सुरेश शिंदे यांचा मुलगा निखिल शिंदे यांनी तक्रार दाखल केली आहे. दगडफेकीत गाडीचे पुढील काचेसह काही भाग नुकसानग्रस्त झाले. ही घटना निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर घडल्याने नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. या हल्ल्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप रंगलेले दिसून येत आहे. जत पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे.
English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Stone pelting at candidate's house and car in Jat.
Web Summary : Unknown individuals pelted stones at NCP candidate Suresh Shinde's house and car in Jat. Police are investigating the incident after a complaint was filed. The incident has created tension in the area and damaged the car.

Web Title : सांगली: जत में उम्मीदवार के घर और गाड़ी पर पथराव।
Web Summary : जत में राकांपा उम्मीदवार सुरेश शिंदे के घर और गाड़ी पर अज्ञात लोगों ने पथराव किया। शिकायत दर्ज होने के बाद पुलिस मामले की जांच कर रही है। घटना से इलाके में तनाव है और गाड़ी क्षतिग्रस्त हो गई है।