शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
4
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
5
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
6
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
7
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
11
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
12
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
13
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
14
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
15
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
16
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
17
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
18
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
19
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
20
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?

एका दगडाने बिघडले त्याच्या जगण्याचे गणित

By admin | Updated: June 19, 2014 00:57 IST

सांगलीतील घटना : दंगलखोरांनी एसटीवर केलेल्या दगडफेकीचा फटका निष्पाप तरुणाला

अविनाश कोळी सांगलीएका बेसावध क्षणी एक दगड भिरभिरत आला... एसटी बसला लक्ष्य करत धडकून परतला आणि वाहनावरून चाललेल्या एका तरुणाच्या डोक्याला बंदुकीच्या गोळीप्रमाणे दणका देऊन विसावला... हा दणका इतका जोराचा होता की, तो जागीच कोसळला... रक्तबंबाळ अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले... जगण्यासाठी त्याची तडफड सुरू झाली... एका किचकट शस्त्रक्रियेनंतर त्याला जीवदान मिळाले, पण त्याच्या जगण्याचे गणितच या दगडाने बिघडवून टाकले. फेसबुकवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना केल्याच्या वृत्ताने दहा दिवसांपूर्वी सांगलीतील वातावरण बिघडले होते. या घटनेशी ज्यांचा काडीमात्र संबंध नाही, अशा अनेकांना त्याची शिक्षा मिळण्यास सुरुवात झाली. अशीच शिक्षा सांगलीच्या लक्ष्मीनगर येथील आप्पासाहेब चंद्रकांत म्हारगुडे (वय २३) हा तरुण आणि त्याचे कुटुंबीय भोगत आहेत. ८ जून २०१४ ची सायंकाळ... वातावरणात तणाव असला तरी शहरातील रस्त्यांवर वाहतूक सुरळीत होती. सांगलीच्या डॉ. आंबेडकर रस्त्यावरील खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या मित्राला जेवणाचा डबा देण्यासाठी आप्पासाहेब चुलत भावासमवेत दुचाकीवरून चालला होता. सम्राट व्यायाम मंडळासमोरील रस्त्यावर एका एसटी बसलगतच तो होता. सायंकाळचे साडेसात वाजले होते. वेगाने भिरभिरत एक दगड त्या बसच्या दिशेने आला. बसच्या पत्र्याला लागून तो तसाच परतला आणि त्याने आप्पासाहेबाला लक्ष्य केले. एका क्षणात त्याच्या डोक्यावर मोठा आघात झाला. काही कळण्याच्या आतच तो कोसळला. केबल वाहिन्यांसाठी रस्ते खुदाई झाल्यामुळे तो आणखीनच जोरात कोसळला. डोक्याला मार लागल्याने त्याच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. सोबत असलेल्या चुलत भावाने त्याच्या मित्रांना याची कल्पना दिली. जवळच्या रुग्णालयात त्याची तपासणी करण्यात आली. कवटीला जोरात मार लागल्याचे दिसल्याने त्यांनी त्यास मिरजेला मिशन हॉस्पिटलमध्ये नेण्याची सूचना केली. दगडाचा वर्मी घाव बसल्याने तो गंभीर जखमी झाला होता. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करावी लागेल, असे सांगितले. त्याच्या मित्रांनी पैशाची तजवीज केली आणि शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. मात्र यानिमित्ताने त्याच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले.