शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

भेसळयुक्त गाय दुधाचा १० लाखाचा साठा नष्ट, नागज फाट्यावर कारवाई

By घनशाम नवाथे | Updated: May 5, 2025 21:04 IST

Sangli News: अन्न व औषध प्रशासन विभागाने रविवारी दुपारी नागज फाटा (ता. कवठेमहांकाळ) येथे दूध वाहतुक करणाऱ्या टॅंकरची अचानक तपासणी मोहिम राबविली. यावेळी पाच टॅंकरमधील ७५ हजार लिटर दुधाची प्राथमिक तपासणी केली.

- घनशाम नवाथे सांगली - अन्न व औषध प्रशासन विभागाने रविवारी दुपारी नागज फाटा (ता. कवठेमहांकाळ) येथे दूध वाहतुक करणाऱ्या टॅंकरची अचानक तपासणी मोहिम राबविली. यावेळी पाच टॅंकरमधील ७५ हजार लिटर दुधाची प्राथमिक तपासणी केली. गाय दुधामध्ये भेसळीच्या संशयावरून १० लाख ६३ हजार ८६० रूपयांचा ३० हजार ३९६ लीटर गाय दुधाचा साठा नष्ट करण्यात आला. रविवारी रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.

सहाय्यक आयुक्त (अन्न) निलेश मसारे, अन्न सुरक्षा अधिकारी पवार व स्वामी, नमुना सहाय्यक कवळे व कसबेकर यांच्या पथकाने रविवारी दुपारी नागज फाटा येथे थांबून जाणाऱ्या पाच दुध वाहतुक करणाऱ्या टँकरची तपासणी केली. टॅंकरमधील दुधाची ‘इन्स्टंट स्ट्रीप’ च्या सहाय्याने भेसळीची प्राथमिक तपासणी करण्यात आली. यावेळी कोल्हापूर जिल्ह्याकडे जाणाऱ्या टॅंकरमधील दुधाचे तीन नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले.

टॅकर (एमएच ०९ जीआर ५५६७) मधील गाय दुधाची प्राथमिक तपासणी केली. त्यामध्ये मीठाची भेसळ आढळून आली. या टॅंकरमधून दोन कप्प्यातील गाय दुधाचे दोन नमुने विश्लेषणासाठी घेतले. यावेळी गाय दुधाचा १० लाख ६३ हजार ८६० रूपये किंमतीचा ३० हजार ३९६ लिटर गाय दुधाचा उर्वरीत साठा भेसळीच्या संशयावरुन ओतून नष्ट केला. गाय दुधाचा टॅंकर घेरडी (ता. सांगोला) येथील एलकेपी दुध शितकरण केंद्रातून दुध घेवून कोल्हापूर जिल्ह्यातील एका कंपनीकडे जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. नमुने घेतलेल्या दुधाचा विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.भेसळीबाबत थेट तक्रार करानागरिकांना अन्न पदार्थामधील भेसळीबाबत काही माहिती असल्यास तसेच अन्न पदार्थांबाबत काही तक्रारी असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या सांगली कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क करावा. तसेच ई मेल आयडी fdasangli@gmail.com यावर माहिती किंवा तक्रार नोंदवावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त निलेश मसारे यांनी केले आहे.

टॅग्स :milkदूधSangliसांगली