शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीवरील स्थगिती उठवली, सहकार मंत्र्यांचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 18:06 IST

माजी संचालकांच्या अपीलावर १५ दिवसात निर्णय

सांगली: जिल्हा बँकेचे ५० कोटी ५८ लाखाच नुकसान झाल्याप्रकरणी माजी संचालकांच्या सुरु असलेल्या कलम ८८ अंतर्गत चौकशीवरील स्थगिती अखेर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी बुधवारी उठवली. त्यामुळे या चाकशीचा मार्ग खुला झाला आहे. दरम्यान या चौकशीला आव्हान देणाऱ्या माजी संचालकांनी दाखल केलेल्या अपिलावर येत्या पंधरा दिवसात अंतीम निर्णय देणार असल्याचे मंत्री पाटील यांनी जाहीर केले आहे.सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची महाराष्ट्र सहकार अधिनियम कलम ८३ अंतर्गत चौकशी झाली होती. या चौकशी माजी संचालकांच्या काळात बँकेच्या कारभारात अनियमीतता झाल्याचा ठपका ठेवला. तसेच चार प्रकरणात बँकेचे ५० कोटी ५८ लाख रुपयांचे नुकसान झाले असून ते संबधीत माजी संचालककडून वसुल करण्याची शिफारस शासनाकडे केली होती. त्यानुसार शासनाने याप्रकरणी कलम ८८ अंतर्गत चौकशीचे आदेश दिले. यासाठी कोल्हापूरच्या उपनिबंधक डॉ. प्रिया दळणकर यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली.डॉ. दळणकर यांनी चौकशी सुरु करत कलम ८८ अंतर्गत जिल्हा बँक व संबधीत आजी-माजी संचालक, अधिकारी यांना नोटीस बजावल्या होत्या. दरम्यान, काही माजी संचालकांनी या चौकशी विरोधात तत्कालीन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे अपील केले होते. त्यावर जुलै २०२४ मध्ये पहिली सुनावणी झाली. त्यावेळी मंत्री वळसे पाटील यांनी चौकशी ''जैसे थे'' ठेवण्याचे आदेश देत तात्पुरती स्थगीती दिली होती. याप्रकणी २६ सप्टेंबरला २०२४ दुसरी सुनावणी होती. मात्र ही सुनावणी झाली नाही. एक महिन्याने ती पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे जैसे थेचे आदेश कायम राहिले आहेत.राज्यात नवीन सरकार येताच आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांनी जिल्हा बँकेच्या चौकशीवरील स्थगीती उठवण्याची मागणी अधिवेशनात मागणी केली. त्यावेळी सहकार मंत्र बाबासाहेब पाटील यांनी ही स्थगीती उठवणार असल्याचे जाहीर केले. मंत्र बाबासाहेब पाटील यांच्यासमोर बुधवारी याप्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी पाटील यांची चौकशीवरील स्थगिती उठवली.

मात्र येत्या पंधरा दिवसात याप्रकरणी माजी संचालकांनी केलेल्या अपिलावर अंतीम निर्णय देणार असल्याचे सांगत माजी संचालकांना लेखी म्हणणे मांडण्यास सांगीतले. त्यामुळे चौकशी वरील स्थगिती उठवली असली तरी चौकशीलाच आव्हान देणाऱ्या याचिकेवर अंतिम निर्णय होणार असल्याचे याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.

अनाठायी खर्चमहांकाली व माणंगगा कारखाना सेल्स सर्टिफिकेट नोंदणीसाठी विलंब झाल्याने मुद्रांक खात्याने केलेला दंड, विकास संस्थांच्या संगणीकरणासाठी स्व निधीतून केलेला अनाठायी खर्च, नॉन बॅँकिंग ॲसेट खरेदी करताना केलेला चुकीचा जमाखर्च, महाकांली साखर कारखान्याकडील खराब साखर व दरातील फरक या प्रकरणांचा समावेश आहे.

स्थगिती सप्टेंबर २०२४ मध्येच उठलीजिल्हा बँकेच्या विरोधातील तक्रारदार सुनिल फराटे यांचे वकील ॲड. ओंकार वांगीकर म्हणाले, चौकशीविरोधीत माजी संचालकांनी अपील केले तेव्हा जुलै २४ मध्ये तत्कालीन सहकार मंत्र्यांनी पुढील सुनावणीपर्यंत चौकशीला स्थगीती दिली. ही पुढील सुनावणी सप्टेंबर २०२४ मध्ये झाली. त्यावेळी अपील करणाऱ्यांनी स्थगीती कायम ठेवण्याची मागणी केली नाही. कायद्यानुसार ती करणे आवश्यक होते. ती न केल्यामुळे त्याच तारखेला चौकशीवरील स्थगीती उठली आहे. ही बाब आम्ही आज सहकार मंत्री व सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी ती मान्य केली. पंधरा दिवसात याप्रकरणांचा अंतीम निकाल येणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीbankबँक