शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गरिबीचे चटके सोसत विट्यातील भाजीविक्रेत्याचा मुलगा बनला सांख्यिकी अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 06:42 IST

सलीम पानवाले महाराष्ट्रात अव्वल । यूपीएससीच्या परीक्षेत देशात विसावा क्रमांक

दिलीप मोहिते विटा (जि.सांगली) : येथील भाजीपाला विक्रेते कमरूद्दीन व त्यांची पत्नी हसीना पानवाले यांचा मुलगा सलीम याने युपीएससीच्या भारतीय सांख्यिकी सेवा (आयएसएस) परीक्षेत यशाचा झेंडा फडकविला असून, त्याने देशात २० वा, तर महाराष्टात अव्वल येण्याचा मान पटकाविला आहे. या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला.

भारतीय सांख्यिकी अधिकारी म्हणून निवड झालेला सलीम हा महाराष्टातील एकमेव आहे. गरिबीचे चटके सोसत, कष्टाच्या वाटेवरून चालत सलीमने यशोशिखर गाठत केवळ आई-वडिलांचेच नव्हे तर विट्याचे नावही देशस्तरावर कोरले. नगरपरिषदेच्यावतीने बांधण्यात आलेल्या घरकुल आवासात पानवाले कुटुंब वास्तव्यास आहे. कमरूद्दीन, पत्नी हसीना यांचा मुलगा सलीम, अलीम व मुलगी हिनाकौसर असा पाच सदस्यांचा हा परिवार. सलीम हा त्यांचा मोठा मुलगा. दुसरा मुलगा अलीम स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. मुलगी हिनाकौसर एम. कॉमच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. आई व वडील दोघेही अशिक्षित, परंतु मुलांनी शिकावे, मोठे व्हावे, हे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले आणि त्यासाठी प्रचंड कष्ट उपसले.

सलीमने विटा नगरपरिषदेच्या उर्दू शाळेत प्राथमिक, तर येथीलच राहमत अ‍ॅँग्लो उर्दू विद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.सलीमने कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातून संख्याशास्त्रातून एम. एस्सीचे शिक्षण पूर्ण केले होते. त्याने विटा येथील बळवंत महाविद्यालयात दीड महिना प्राध्यापक म्हणून काम केले होते.आई-वडिलांनी आम्हा मुलांसाठी खूप कष्ट केले. त्याची जाणीव होती. त्यामुळे मी सुद्धा खूप अभ्यास केला. त्याला यश मिळाले. निकाल ऐकल्यानंतर डोळ्यात आनंदाश्रू होते. देशासाठी, लोकांसाठी चांगले काम करण्याचे स्वप्न आहे. पदाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न राहील. - सलीम पानवाले, सांख्यिकी अधिकारीपहिल्याच प्रयत्नात यशसलीमने दररोज पाच ते सहा तास अभ्यास केला. जूनमध्ये सांख्यिकी अधिकारी पदासाठी परीक्षा झाली. यात सहापैकी चार पेपर हे संख्याशास्त्रावर आधारित होते, तर इंग्रजी व जनरल स्टडीज् असे अन्य दोन विषय होते.

टॅग्स :Indiaभारतupscकेंद्रीय लोकसेवा आयोग