सांगली जिल्हा अभियंता संघटनेतर्फे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सर विश्वेश्वरय्या यांची प्रतिमा भेट देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली जिल्हा अभियंता संघटनेतर्फे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना विविध मागण्यांचे निवेदन व सर विश्वेश्वरय्या यांची प्रतिमा भेट देण्यात आली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महावीर पाटील, अतुल बेळे, राकेश संगलगे, जयराज बर्गे, संकेत निकम, धनराज सातपुते आदी उपस्थित होते. सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना जिल्हा परिषदेत दीड कोटींपर्यंत नोंदणीची परवानगी द्यावी, थकीत देणी निकाली काढावीत, आदी मागण्या करण्यात आल्या. त्याविषयी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन पटोले यांनी दिले. यावेळी काॅंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, वसंतदादा पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, उपमहापौर विशाल पाटील उपस्थित होते.