सांगली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा शनिवारी (दि. ४) होणार आहे. या परीक्षेसाठी सांगली व मिरज शहरातील एकूण ५१ ठिकाणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून शंभर मीटर १४४ कलम लागू करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.
-------------
सांगलीतून दुचाकी लंपास
सांगली : शहरातील गोकुळनगर परिसरातून २५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी अनिल श्रीमंत पवार (रा. मिरज) यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
-----------
ई-पीक पाहणी ॲप घेण्याचे आवाहन
सांगली : पीक कर्ज, पीक विमासह इतर लाभांसाठी शेतकऱ्यांना आता आपल्या बांधावरूनच नोंदणी करता येणार आहे. यासाठी शासनाने ई-पीक पाहणी ॲप विकसित केले आहे. या ॲपमुळे आता मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकाची माहिती त्यांच्या बांधावरूनच नोंदविता येणार आहे. यासाठी ॲप घेऊन नोंद करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले.