इस्लामपूर : राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा विभागामार्फत राज्यस्तरीय ऑनलाइन स्पर्धा झाली. राज्यभरातून ६३८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ६८ तंत्रनिकेतने सहभागी झाली होती.
संचालिका डॉ. सुषमा कुलकर्णी, डॉ. एच. एस जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झाले.
या स्पर्धेत टेक्निकल टॉपिक प्रेझेटेशन, ऑनलाइन क्विज, इस्टिमेट मास्टर, इमेज एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग, पोस्टर प्रेझेंटेशन व व्यक्तिमत्त्व विकास क्विज या स्पर्धांचा समावेश होता. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
प्रा. प्रवीण देसाई, प्रा. महेश यादव, प्रा. अन्सार मुलाणी, प्रा. स्वप्निल गायकवाड व प्रा. सुमिता पाटील यांनी परिश्रम घेतले. मुख्य समन्वयक म्हणून प्रा. अक्षय कुलकर्णी यांनी काम पाहिले. प्राचार्य आर. डी. सावंत, विश्वस्त प्रा. शामराव पाटील, डॉ. एल. एम. जुगुलकर, प्रा. सौ. अश्विनी पाटील यांनी यशस्वितांचे अभिनंदन केले.