शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

OBC-Reservation Sangli : ओबीसी आरक्षणासाठी लोणावळा येथे राज्यस्तरीय चिंतन शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 10:31 IST

OBC-Reservation Sangli : ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्यस्तरीय चिंतन शिबीर शनिवारी व रविवारी (दि. २६ व २७) लोणावळा येथे आयोजित केले आहे. नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार व धनगर समाजाचे नेते अण्णासाहेब डांगे यांच्या उपस्थितीत उदघाटन होईल. ओबीसी संघटनेचे राज्य समन्वयक अरुण खरमाटे यांनी ही माहिती दिली.

ठळक मुद्देओबीसी आरक्षणासाठी लोणावळा येथे राज्यस्तरीय चिंतन शिबीरचिंतन शिबिरासाठी राज्यभरातून ३०० प्रमुख प्रतिनिधी उपस्थित राहणार

सांगली : ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्यस्तरीय चिंतन शिबीर शनिवारी व रविवारी (दि. २६ व २७) लोणावळा येथे आयोजित केले आहे. नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार व धनगर समाजाचे नेते अण्णासाहेब डांगे यांच्या उपस्थितीत उदघाटन होईल. ओबीसी संघटनेचे राज्य समन्वयक अरुण खरमाटे यांनी ही माहिती दिली.प्रत्येक दिवशी चार अभ्यासकांची व्याख्याने होतील. ओबीसींच्या राजकीय आरक्षणातील कायदेशीर अडचणी, देशभरातील ओबीसी समाजापुढीलसमस्या, मंडल आयोगातील ओबीसींसाठीच्या तरतुदींच्या अंमलबजावणीतील अडचणी, ओबीसी जनगणनेतील राजकीय अडथळे आदी विषयांवर विचारमंथन होईल. दुसऱ्या दिवशी माजी मंत्री पंकजा मुंडे, कॉंंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सहभागी होणार आहेत. या शिबिरातील महत्वाचे ठराव मुख्यमंत्री व प्रधानमंत्र्यांना पाठवले जाणार आहेत.खरमाटे म्हणाले की, आरक्षणाच्या विषयावरुन ओबीसी व अन्य समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम काही लोक करत आहेत. संविधानाने दिलेले आरक्षण हिरावण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे आम्ही होऊ देणार नाही. आमच्या वाट्याचे व हक्काचे आरक्षण मिळायलाच हवे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. ओबीसींना राजकारणातून बाहेर हाकलण्याचा हा प्रयत्न आहे. याविरोधातही कायदेशीर लढा दिला जाईल. प्रसंगी समाज रस्त्यावरही येईल. यावेळी शशिकांत गायकवाड, सुनील गुरव, नंदकुमार निळकंठ, अर्चना सुतार, राजश्री मालवणकर आदी उपस्थित होते.शिबिराला ३०० सदस्य येणारलोणावळ्यातील चिंतन शिबिरासाठी राज्यभरातून ३०० प्रमुख प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. कोरोनाविषयक नियमांचे पालन करत शिबीर पार पडेल. ओबीसी आरक्षणासाठीच निर्णायक दिशा शिबिरात निश्चित होईल असे खरमाटे यांनी सांगितले.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणSangliसांगली