शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा ४ फेब्रुवारीपासून सांगलीत; उपमुख्यमंत्री, क्रीडामंत्र्यांच्या हस्ते उदघाटन 

By अशोक डोंबाळे | Updated: January 1, 2024 19:08 IST

प्रशासनाकडून स्पर्धेची तयारी

सांगली : कै. भाई नेरूरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा सांगली येथे ४ ते ७ फेब्रुवारीपासून आयोजित करण्यात येत आहेत. या स्पर्धांचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन बैठका चालू झाल्या आहेत.पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कै. भाई नेरूरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा आयोजन समितीची बैठक सांगलीत घेतली. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे संदीप तावडे, क्रीडा व युवक सेवा कोल्हापूरचे उपसंचालक माणिक पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, आकाशवाणी सांगली कार्यक्रम प्रमुख श्रीनिवास जरंडीकर, शेखर इनामदार, डॉ. प्रशांत इनामदार, नरेंद्रकुमार गाढवे, गजानन शेळके, हणमंत सरगर, देवेंद्र पाटील, प्रविण नंदगावे, गजानन मगदूम, एम. एस. आलासे आदि उपस्थित होते.पालकमंत्री सुरेश खाडे म्हणाले, बैठकीत स्पर्धा स्थळ व तारीख अंतिम करण्याबाबत चर्चा झाली. ४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान राज्यस्तरीय खो-खो स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी येणारे खेळाडू, पंच, सामनाधिकारी, अधिकारी व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या निवास व्यवस्थेबाबत चर्चा करण्यात आली. भोजन व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, पाणी व्यवस्था, प्रेक्षक गॅलरी, बॅरिकेटींग, स्पर्धेसाठी आवश्यक स्टेज, मंडप, विद्युत व्यवस्थेचे संबंधितानी काटेकोर नियोजन करून स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी दक्ष रहावे, अशा सूचना त्यांनी संबंधीतांना दिल्या. जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी स्पर्धेच्या आयोजनाबाबत सविस्तर माहिती दिली.

निधीचा प्रस्ताव तातडीने द्या : सुरेश खाडेराज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी भाेजन व्यवस्था, खेळाडूंची निवास, स्टेज, मंडप, विद्युत व्यवस्थेसाठी किती निधीची गरज आहे. या सर्वांचा तातडीने प्रस्ताव अधिकाऱ्यांनी सादर करण्याची गरज आहे. तातडीने संबंधीत विभागाला निधी वर्ग करण्यात येईल, असेही पालकमंत्री सुरेश खाडे म्हणाले.

टॅग्स :Sangliसांगली