शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
3
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
4
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
5
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
6
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
7
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
8
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
9
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
10
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
11
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
12
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
13
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
16
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
17
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
18
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
19
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती

किसान सभेतर्फे येत्या बुधवारी अकोले ते लोणी राज्यस्तरीय पायी मोर्चा, मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास लढा तीव्र करणार

By अशोक डोंबाळे | Published: April 24, 2023 6:08 PM

केंद्राच्या चुकीच्या धोरणाने दुग्ध व्यवसाय अडचणीत

सांगली : नैसर्गिक आपत्ती व राज्यात सुरू असलेल्या नीतिभ्रष्ट राजकारणाचा परिणाम म्हणून शेतकरी आणि श्रमिकांचे मूलभूत प्रश्न अत्यंत तीव्र झाले आहेत. राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे विकासाचे प्रश्न बाजूला फेकले आहेत. पक्ष फोडण्याची राजकीय आमिषे व तुरुंगाच्या भीतीमुळे प्रस्थापित राजकीय नेते व पक्ष अडचणीत आहेत. जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नसल्यामुळे किसान सभेच्या पुढाकाराने दि. २६ एप्रिलपासून अकोले ते लोणी असा राज्यव्यापी पायी मोर्चा काढणार आहे, अशी माहिती किसान सभेचे राज्याध्यक्ष कॉ. उमेश देशमुख यांनी सांगलीत दिली.कॉ. देशमुख म्हणाले, किसान सभा, सीटू, बांधकाम कामगार फेडरेशन, अखिल गुरव समाज संघटना, शेतमजूर युनियन, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय, एसएफआय या समविचारी संघटनांच्या सहभागाने मोर्चा काढणार आहे. दि. २६ ते २८ असे तीन दिवस पायी चालून, महसूल व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर धडकणार आहे.मोर्चातील मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मोर्चाचे रूपांतर लोणी येथे बेमुदत महामुक्काम आंदोलनात करून लढा तीव्र करणार आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. सरकारने या पिकांना नुकसानभरपाई देण्याच्या घोषणा केल्या. प्रत्यक्षात मदत केली नाही. वन जमिनी, देवस्थान, इनाम, वक्फ, गायरान व घरांच्या तळ जमिनी नावे करण्याची आश्वासने दिली आहेत. जमीन नावे करण्याऐवजी पोलिस व वन विभागाचा दुरुपयोग करत गरीब श्रमिकांना अमानुषपणे मारहाण करून घरे व जमिनींवरून हुसकावून काढण्याच्या मोहिमा सुरू केल्या आहेत. जबरदस्तीने व अत्यल्प मोबदला देत शेतकऱ्यांच्या जमिनी रस्ते, कॉरीडोर, विमानतळ व तथाकथित विकासकामांसाठी हडप केल्या जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.आंदोलनात डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत, डॉ. अजित नवले, किसन गुजर, सुभाष चौधरी, चंद्रकांत घोरखाना, डॉ. उदय नारकर, सावळीराम पवार, सुनील मालुसरे आदींसह हजारो शेतकरी सहभागी असणार आहेत.केंद्राच्या चुकीच्या धोरणाने दुग्ध व्यवसाय अडचणीतकोरोना संकटात १७ रूपये लिटरप्रमाणे दूध विकावे लागल्याने हतबल झालेले दूध उत्पादक आता थोडे व्यवसायात पुन्हा उभे राहू लागले आहेत. तोपर्यंत पुन्हा एकदा केंद्र सरकारने दुग्धपदार्थ आयात करण्याच्या हालचाली सुरू करून दुग्ध उत्पादकांचे जिणे हैराण केले आहे, असा आरोपही उमेश देशमुख यांनी केला.

टॅग्स :SangliसांगलीKisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्च