शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ऊसाला राज्यबंदी लावताय, 'तर टनाला पाच हजार रुपये द्या'

By संतोष भिसे | Updated: September 16, 2023 18:34 IST

दुष्काळाच्या सवलती जाहीर कराव्यात

सांगली : ऊसाला राज्यबंदी लावणार असाल, तर कारखान्यांनी प्रतिटन पाच हजार रुपये दर द्यावा असे आवाहन शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य महादेव कोरे यांनी केले आहे. दर मिळणार नसेल, तर शेतकरी आपले उत्पादन कोठेही विकण्यास स्वतंत्र राहील असेही त्यांनी सांगितले. राज्य शासनाने ऊस परराज्यात पाठविण्यास बंदीचा आदेश शुक्रवारी काढला आहे. यंदा राज्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम ऊसाच्या उत्पादनावर होणार आहे. राज्यातील कारखान्यांना ऊस कमी पडण्याच्या शक्यतेने परराज्यात ऊस पाठवता येणार नाही, असे आदेशात म्हटले आहे. शेतकरी संघटनेने यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोरे म्हणाले, शेतकऱ्याने पिकविलेल्या ऊसाची मालकी शेतकऱ्याचीच आहे.  कारखाने किंवा सरकारला मालकी दाखवता येणार नाही. जो चांगला भाव देईल, त्याला आपले उत्पादन विकण्यास शेतकरी स्वतंत्र आहे. राज्य सरकारच्या आदेशाचा गैरफायदा घेत कारखाने दर पाडण्याचे कारस्थान करण्याची भिती आहे. कारखान्यांचे हित पाहणाऱ्या सरकारने आपण प्रथम शेतकऱ्यांच्या कल्याणाशी बांधील आहोत हे लक्षात ठेवावे. कारखाने चालवायचे असतील, तर ऊसाला प्रतिटन पाच हजार रुपये भाव द्यावा.कोरे म्हणाले, गेल्या पाच वर्षांत साऱखरेचा भाव ३५ रुपयांवरुन ४५ रुपयांपर्यंत गेला आहे. फक्त २० टक्के साखर सर्वसामान्य लोक वापरतात. उर्वरित ८० टक्के साखर उद्योगांकडून वापरली जाते. उद्योगांनी साखरेपासूनच्या उत्पादनांचे भाव सतत वाढवत नेले आहेत. पण त्याचा कोणताही फायदा  शेतकऱ्यांना होत नाही. त्याशिवाय ऊसाचा उत्पादन खर्चही वाढला आहे. या स्थितीत शेतकऱ्यांचा ऊस अडविण्याचे पाप सरकारने करु नये. चांगला भाव देणाऱ्या कारखान्याला ऊस पाठविण्यासाठी त्याला मोकळीक द्यावी. अन्यथा, शेतकरी संघटना मार्ग शोधेल.दुष्काळाच्या सवलती जाहीर कराव्यातकोरे म्हणाले की, ऑक्टोबर महिना तोंडावर आला, तरी पुरेसा पाऊस झालेला नाही. हवामानाचे अंदाज फोल ठरले असून खरीप हंगाम कोरडाच गेला आहे. त्यामुळे शासनाने दुष्काळाच्या सवलती त्वरित जाहीर कराव्यात.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने