शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात योग चळवळीच्या रुंदावल्या कक्षा...अनेक संस्थांचा पुढाकार :आशादायी चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 00:18 IST

शरीराला आरोग्याचा मंत्र देत सांगली जिल्ह्यात पेटविलेली योगाची मशाल प्रज्वलित होऊन तिच्या प्रकाशात आता चळवळीचे रुजलेले बीज अंकुरताना दिसत आहे

ठळक मुद्दे शहरी, ग्रामीण लोकांचा योगाकडे वाढता कल

शरद जाधव ।सांगली : शरीराला आरोग्याचा मंत्र देत सांगली जिल्ह्यात पेटविलेली योगाची मशाल प्रज्वलित होऊन तिच्या प्रकाशात आता चळवळीचे रुजलेले बीज अंकुरताना दिसत आहे. ४५ वर्षांपासूनच्या जनजागृतीच्या आसनांनी आता चळवळ जिल्ह्यात सर्वदूर रुजत असल्याचे आशादायी चित्र आहे.

जिल्ह्यात सांगली जिल्हा योग परिषद, विश्वयोग दर्शन केंद्र, पतंजलि योग समिती, आर्ट आॅफ लिव्हिंगसह अनेक स्वयंसेवी संस्थांनीही योग प्रसारात आघाडी घेतली असून, लहान मुलांपासून वृध्दांपर्यंत सर्वांसाठी योग शिबिरांचे आयोजन होत आहे. चुकीच्या सवयी, जंकफूडचा वाढता वापर, विविध क्षेत्रातील वाढती स्पर्धा यांसह अनेक कारणांनी सध्या तणावात वाढ होत आहे. यावर वैद्यक शास्त्रांनी विविध संशोधने केली असली तरी, प्रभावी उपाय म्हणून योगाचा प्रचार वाढत आहे. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील योग चळवळीचा आढावा घेतल्यानंतर आशादायी चित्र दिसून आले.वर्षभर सुरू असतात उपक्रमपतंजलि योग समितीच्यावतीने शहरातील विविध उपनगरात नियमितपणे योग शिबिरे घेण्यात येतात. सांगली शहरात आमराई, त्रिकोणी बाग, महावीर उद्यान, बालाजीनगर, गावभाग, तरूण भारत क्रीडांगण, छत्रपती शिवाजी क्रीडांगण याठिकाणी योग शिबिरे होतात. चंद्रकांत सबनीस त्रिकोणी बाग परिसरात योग प्रशिक्षण देतात. ‘पतंजलि’च्यावतीने जिल्हाभरही तालुक्याच्या ठिकाणी व गावांमध्ये योग शिबिरे होत आहेत. हरिद्वार येथे प्रशिक्षण घेऊन आलेले योग शिक्षक शिबिरार्थींना प्रशिक्षण देतात. ही शिबिरे पूर्णपणे नि:शुल्क असतात. जिल्हा प्रभारी श्याम वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर हे उपक्रम सुरू असतात.शिबिरांना मिळतोय प्रतिसादपतंजलि योग समिती, मिरजेचे विश्वदर्शन योग केंद्र, आर्ट आॅफ लिव्हिंग या संस्थांबरोबरच सांगली शहरात अनेकजण स्वतंत्रपणेही योग शिबिरे आयोजित करत आहेत. त्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सांगलीत नीलम गाजी घेत असलेल्या ‘फिटनेस डेफिनेशन’मध्ये योगाला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी योग दिनाला शहरात विविध ठिकाणी शिबिरे घेतली जातात. आज योग दिनानिमित्त १०८ सूर्यनमस्काराचा उपक्रम गाजी यांच्यातर्फे राबविण्यात येणार आहे.४५ वर्षांपासूनची परंपरा...सांगलीतील योगाची चळवळ खूप जुनी आहे. जवळपास ४५ वर्षांपासून सांगलीत याविषयी जागृती व प्रसाराचे काम सुरू झाले आहे. सांगलीतील टिळक स्मारक, सावरकर प्रतिष्ठान, मिरजेतील अंबाबाई तालीम, भानू तालीम संस्थेत योगासनांचे प्रशिक्षण दिले जात होते. १९८१ मध्ये अ‍ॅड. वसंतराव पाटील यांच्या पुढाकाराने योग संमेलन सांगलीत भरविले होते. दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील त्या संमेलनाचे अध्यक्ष होते.

टॅग्स :YogaयोगSangliसांगली