शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

एसटी फेऱ्या कपातीमुळे ग्रामीण प्रवाशांना फटका : -सुटीत मुक्कामी एसटी फेºया बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 23:41 IST

वाढत्या तोट्यामुळे एसटीच्या फेºयात कपात करण्यात येत असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. शाळांना सुटी लागल्यामुळे मे महिन्यात अनेक गावांतील मुक्कामी बसेस अनियमित असल्याने प्रवासी वडापवर अवलंबून आहेत.

ठळक मुद्देप्रशासनाकडून तोट्याचे कारण

सदानंद औंधे ।मिरज : वाढत्या तोट्यामुळे एसटीच्या फेºयात कपात करण्यात येत असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. शाळांना सुटी लागल्यामुळे मे महिन्यात अनेक गावांतील मुक्कामी बसेस अनियमित असल्याने प्रवासी वडापवर अवलंबून आहेत. मिरज आगाराला वार्षिक अडीच कोटी तोटा होत असून, कर्नाटक एसटीच्या रोजच्या ३०० फेऱ्यांच्या आक्रमणामुळे मिरज आगार अडचणीत आहे.एसटीच्या मिरज आगाराकडे ९९ बसेस व ५२१ कर्मचारी आहेत. दररोज ३८ हजार किलोमीटर प्रवासी वाहतूक करण्यात येते. तालुक्यातील ६४ गावांपैकी पूर्व भागातील ३० गावांसाठी मिरज आगारातून एसटी फेºया सुरू आहेत. ग्रामीण भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी वाहतुकीसाठी मिरजेतून लक्ष्मीवाडी, पायापाचीवाडी, भोसे, सोनी, शंभर्गी, जंबगी, खटाव, मणेराजुरी, लिंगनूर, कवठेगुलंद, सलगरे, कौलगे या गावात रात्री उशिरा जाऊन सकाळी परत येणाºया ग्रामीण विभागाच्या १३ व शहरी विभागाच्या ८ मुक्कामी गाड्या सुरू आहेत.

मात्र मुक्कामी गाड्यांसाठी वाहक, चालक उपलब्ध होत नसल्याने, अनेक वेळा या फेºया रद्द होतात. शाळांना सुटी असलेल्या दिवशी मुक्कामी फेरी रद्द करण्यात येते. मे हा सुटीचा महिना असल्याने या कालावधित मुक्कामी गाड्या अनियमित असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना वडापवरच अवलंबून राहावे लागत आहे. यापूर्वी ढवळी व सलगरे रस्ता खराब असल्याने एसटी वाहतूक बंद केली होती. मात्र आता रस्ता झाल्यानंतर वाहतूक परवडत नसल्याने या गावातील एसटी फेºयांत कपात केली आहे. ढवळीला सुटीदिवशी एसटी येत नसल्याने या गावात पूर्वी बंद असलेली वडाप वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे.

एसटीचा तोटा वाढत असल्याने कमी उत्पन्न मिळणाºया मुक्कामी गाड्यांची काटछाट करण्यात येते. नरवाडला जाणाºया पाच फेºया कमी करण्यात आल्या आहेत. मिरज पूर्व भागातील अनेक गावात हीच परिस्थिती आहे. तोटा कमी करण्यासाठी एसटीच्या फेºयांतील कपातीमुळे त्याचा फायदा वडाप चालकांना मिळत असल्याने, एसटीचा तोटा वाढतच असल्याचे चित्र आहे. एसटीच्या फेºया कमी झाल्याने ग्रामीण भागात स्वत:ची वाहने असलेल्या सधन मंडळींना याचा त्रास न होता सामान्य गरीब प्रवाशांनाच याचा फटका बसत आहे. एसटी व्यवस्थापनाने ग्रामीण भागातील कमी प्रवासी असलेल्या मार्गावर एसटी फेºया टिकविण्यासाठी नियोजन करण्याची आवश्यकता आहे.

सीमाभागातून ये-जा करणाºया प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र कर्नाटकातून दररोज मिरज-सांगलीत येणाºया बसेसची संख्या सुमारे तीनशेपर्यंत असल्याने, या प्रवासी वाहतुकीचा केवळ दहा टक्के वाटा महाराष्टÑ एसटीला मिळत आहे. आंतरराज्य प्रवासी वाहतुकीच्या कराराप्रमाणे सीमेवरून २० किलोमीटर अंतरापर्यंत प्रवासी वाहतुकीसाठी परवानगीचे बंधन नसल्याने, कर्नाटक सीमेपासून जवळ असलेल्या सांगली, मिरज या मोठ्या शहरांचा फायदा कर्नाटक एसटीला झाला आहे. मिरजेतून अथणी, चिक्कोडी, जमखंडी, विजापूर, बागलकोट या कर्नाटकातील शहरांकडे जाणाºया दैनंदिन फेºया केवळ दहा आहेत. मात्र अथणी, चिक्कोडी व जमखंडी येथून प्रत्येक वीस मिनिटाला कर्नाटक एसटी मिरज-सांगलीला येते.शाळांना सुटी असल्याने मुक्कामी बसेस बंदमे महिन्यात शाळांना सुटी असल्याने कमी उत्पन्नाच्या काही मुक्कामी बसेस बंद करण्यात आल्या आहेत. प्रवासी कमी असलेल्या मार्गावर एसटी फेºया परवडत नसल्याने, तोटा कमी करण्यासाठी फेºया कमी कराव्या लागत आहेत. प्रवाशांची मात्र कोणतीही गैरसोय होऊ देणार नाही. प्रवाशांच्या मागणीनुसार बसेस सोडल्या जात आहेत. प्रवाशांची सोय करुनच एसटीचा तोटा कमी करण्याला आमचे प्राधान्य आहे. मिरज एसटी आगाराला गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तोटा कमी असून तोटा भरून काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती मिरज आगाराचे व्यवस्थापक शिवाजीराव खांडेकर यांनी दिली.नोंदणीपेक्षा : तिप्पट फेºयाकागदोपत्री नोंद असलेल्या फेºयांपेक्षा तिपटीने कर्नाटक एसटीच्या फेºया सुरू असल्याने, कर्नाटक एसटीच्या आक्रमणापुढे महाराष्टÑ एसटीने हात टेकले आहेत. महाराष्टÑ एसटीच्या वेळेत कर्नाटकाच्या अनेक एसटी बसेस धावत असल्याने, कर्नाटकात जाणाºया फेºया सुरू ठेवणे महाराष्टÑ एसटीसाठी अडचणीचे ठरले आहे.

टॅग्स :state transportएसटीSangliसांगली