शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांच्या डिझेल अनुदानावर 'एसटी'चा डल्ला, निमशासकीय संस्थेकडून शासनाची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 16:26 IST

पेट्रोल पंपांवर सर्वसामान्यांसाठी किरकोळ (रिटेल) स्वरूपात मिळणारे इंधन अनुदानित असते. एसटीने तेथून डिझेल घेतले, तर. सर्वसामान्यांसाठीच्या अनुदानावर डल्ला मारण्याचा प्रकार होणार आहे.

सांगली : तोट्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडणाऱ्या एसटी महामंडळाने डिझेलसाठी खासगी पंपांवर धाव घेतली आहे. एसटीची ही कृती नियमबाह्य मानली जात असून - खासगी पंपचालकांमध्येही एसटीला डिझेल पुरविण्याबाबत दुमत आहे.पेट्रोल पंपांवर सर्वसामान्यांसाठी किरकोळ (रिटेल) स्वरूपात मिळणारे इंधन अनुदानित असते. एसटीने तेथून डिझेल घेतले, तर. सर्वसामान्यांसाठीच्या अनुदानावर डल्ला मारण्याचा प्रकार होणार आहे. शासनाच्या अंगिकृत संस्थेकडूनच असे बेकायदा कृत्य केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एसटीसारख्या घाऊक खरेदीदार संस्थांना विनाअनुदानित स्वरूपात डिझेल दिले जाते. रिटेल पेट्रोल पंपावरील डिझेलपेक्षा एसटीला कंझ्युमर पंपावरून प्रतिलिटर २२.६१ रुपये जास्त दराने डिझेल मिळते. पंपांवरील स्वस्ताईचा फायदा उचलण्यासाठी एसटीने तेथून डिझेल खरेदीचा निर्णय घेतला आहे.

यासाठी एसटीने निविदा सूचना काढली आहे. कमीत कमी दरात पुरेशा डिझेलचा अखंडित पुरवठा कमाल उधारित करू शकणारे पंप पुरवठ्यासाठी पात्र असतील. संबंधित पंपावर एसटीचा इंधन लिपिक व सुरक्षा रक्षक ठेवला जाणार आहे. पाच लिटरची कॅन भरून मापात पाप नाही. याची खातरजमा करायची आहे. डिझेलचा घाऊक आणि किरकोळ दर एकसमान होईपर्यंत किंवा दोहोंतील फरक २५ पैसे होईपर्यंत खासगी पंपांवरून डिझेल घ्यायचे आहे. त्यासाठी पंपमालकासोबत १०० रुपयांच्या मुद्रांकावर करारही करायचा आहे. करार झाला नाही, तरी डिझेल घेण्याचे थांबवू नये, असेही निविदा सूचनेत स्पष्ट केले आहे.

दरम्यान, एसटीच्या या कार्यवाहीविषयी पंपचालकांतही दुमता आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन नियमितपणे देण्याची महामंडळाची सध्याची नाजूक स्थिती पाहता डिझेलची बिले नियमित मिळतील याची हमी पंपचालकांना नाही. करारातील बहुतांश अटी एसटीच्याच बाजूने असल्यानेही पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. पंपमालकांनी स्वत:च्या जबाबदारीवर करार करावेत, अशी सूचना फामपेडा या पेट्रोल पंप चालकांच्या संघटनेने केली आहे.

सांगली विभाग नियंत्रकांनी डिझेल पुरवठ्यासाठी निविदा मागविल्या आहेत. दररोज ३५ हजार ४०० लिटर डिझेलची आवश्यकता असून पुढील वर्षभरासाठी पुरवठा करायचा आहे.

निमशासकीय संस्थेकडून शासनाची फसवणूकसर्वसामान्यांसाठीच्या अनुदानावर एसटीकडून डल्ला मारला जाणार हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. हाच मुद्दा कळीचा बनला आहे. एसटीला घाऊक दर लागू असताना, किरकोळ दराचे डिझेल खरेदी करणे म्हणजे शासनाची आणि तेल कंपन्यांची फसवणूक असल्याच्या प्रतिक्रिया इंधन व्यवसायातील तज्ज्ञांनी व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :SangliसांगलीST Strikeएसटी संपDieselडिझेल