सांगली : आदर्श मित्र मंडळातर्फे क्रीडा क्षेत्रातील गुणवंत खेळाडू व प्रशिक्षकांना क्रीडारत्न पुरस्काराने गौरविण्यात आले़ राज्य, राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत सांगली जिल्ह्याचे नाव उंचावणाऱ्या खेळाडूंचाही यावेळी गौरव करण्यात आला़ राष्ट्रीय शरीरसौष्ठव पंच डॉ़ सुहास विष्णुपंत व्हटकर यांना २०१४ चा विशेष क्रीडारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला़ व्हटकर हे मनपाच्या घरपट्टी विभागात कार्यरत आहेत़ त्यांनी आॅल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेत तीनवेळा शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले़ महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते यांच्या हस्ते खेळाडूंना गौरविण्यात आले़ पीयूष भाटे यांनी ‘शरीरसौष्ठव खेळ : व्यायाम आणि आहार’ विषयावर खेळाडूंना मार्गदर्शन केले़ सचिन सवाखंडे यांनी सूत्रसंचालन केले़ भारतश्री रवींद्र आरते यांनी स्वागत केले़ यावेळी आंतरराष्ट्रीय पंच रामकृष्ण चितळे, श्रीराम कोळी, वसंत हंकारे, मनप्रितसिंग चढ्ढा, मारुती शिंदे, नटराज कदम, उदय ओंकार, सुनील पुजारी, प्रितम उमतार, आदी उपस्थित होते़ (क्रीडा प्रतिनिधी)
आदर्श मंडळातर्फे क्रीडा पुरस्कार
By admin | Updated: December 16, 2014 23:32 IST