शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: पलूसमध्ये भरधाव टेम्पो दुकानांत घुसला, धडकेत एकजण गंभीर जखमी; मद्यधुंद चालकाला चोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 12:54 IST

कराड-तासगाव महामार्गावर पलूस पोलिस स्टेशनजवळ भवधाव टेम्पो दुकान गाळ्यांमध्ये घुसून नुकसान झाले.

पलूस: कराड-तासगाव महामार्गावर पलूस पोलिस स्टेशनजवळ टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला. तसेच दुकानांच्या गाळ्यांमध्ये टेम्पो घुसल्याने अंदाजे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना रविवार रात्री घडली. जखमी व्यक्तीस उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथून त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिककडे जाणारा टेम्पोत एका लोखंडी कारखान्याचे साहित्य भरून तासगाव दिशेने निघाला होता. पलूस पोलिस स्टेशनजवळ, दत्त भवन पानशॉपजवळ हा टेम्पो भरधाव वेगाने जात असताना अचानक चालकाचा ताबा सुटून रस्त्याने चाललेल्या एका व्यक्तीला जोरदार धडकल्याने ती व्यक्ती गंभीर जखमी झाली. जखमी व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकलेले नाही, मात्र तो पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील एका हॉटेलमधील वेटर असल्याचे समजले आहे.या व्यक्तीला धडक दिल्यानंतर टेम्पो दत्त भवन पानशॉप आणि शेजारच्या एका दुकानाला धडकला. दोन्ही दुकानांच्या गाळ्यांचे शटर तोडून टेम्पो आत घुसला. पुढे टेम्पो दुसऱ्या दिशेने गेला आणि लोखंडी खांबाला धडकून थांबला. या दुर्घटनेत टेम्पो आणि दोन्ही दुकानांचे अंदाजे तीन लाखांचे नुकसान झाले आहे.

टेम्पोचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळून आले. नागरिकांनी त्याला मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पलूस पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, मात्र पोलिसांनी पुढील तपास सुरू ठेवला आहे.