शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

किसान क्रेडिट कार्ड वितरणासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम : चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 14:17 IST

केसीसी कार्ड धारक नसलेल्या सर्व शेतकऱ्यांना विशेष ग्राम सभा घेऊन आणि त्यांच्या पर्यंत पोहचून केसीसी कार्ड वितरीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या आहेत.

ठळक मुद्देकिसान क्रेडिट कार्ड वितरणासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम : चौधरीकेसीसी कार्ड धारकांची संख्या 1 लाख 75 हजार हजारांच्या आसपास

सांगली : केंद्र सरकारच्या कृषी आणि किसान विकास मंत्रालयातर्फे काढण्यात आलेल्या आदेशानुसार दिनांक 8 फेब्रुवारी पासून पुढील 15 दिवसांसाठी सर्व शेतकरी बांधवाना किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) योजनेत सामावून घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत.

या कामी सर्व बँका, कृषी विभाग, मत्स्यपालन विभाग, पशुपालन विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून किसान सन्मान योजनेमध्ये लाभार्थी असणाऱ्या परंतु केसीसी कार्ड धारक नसलेल्या सर्व शेतकऱ्यांना विशेष ग्राम सभा घेऊन आणि त्यांच्या पर्यंत पोहचून केसीसी कार्ड वितरीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या आहेत.केंद्र सरकारने मागील वर्षापासून शेतकऱ्यांना अर्थ सहाय्य रूपाने 6 हजार रूपये वार्षिक मदत जाहीर केली आहे. परंतु मंत्रालयाच्या असे निदर्शनास आले आहे की प्रधान मंत्री किसान योजनेत सहभागी असणाऱ्या बऱ्याच शेतकऱ्यांकडे किसान कार्ड उपलब्ध नाहीत. असे शेतकरी केसीसी कार्डाच्या माध्यमातून मिळणाऱ्या विविध योजनांपासून वंचित राहतात.

अशा कार्ड नसलेल्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून आणि त्यांच्याकडून माहिती घेऊन सर्व बँकांनी पंधरा दिवसात त्यांना केसीसी कार्ड वितरीत करावयाचे आहे. देशभरात राबवण्यात येणाऱ्या या विशेष उपक्रमांतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे केसीसी कार्ड नाही त्यांनी नजीकच्या बँक शाखेकडे संपर्क साधून एक पानी अर्ज भरून द्यावा. सर्व बाबींची पूर्तता झाल्यावर बँकामार्फत अशा शेतकऱ्यांना त्वरित केसीसी कार्ड वितरीत केले जाईल.

जे शेतकरी केसीसी कार्ड धारक आहेत पण त्यांचे कार्ड वापरात नसल्याने बंद आहे, अशा शेतकऱ्यांनाही या योजनेंतर्गत नवीन कार्ड देण्यात येईल. या विशेष उपक्रमांतर्गत वितरीत करण्यात येणाऱ्या नवीन केसीसी कार्डासाठी कोणतेही शुल्क बँकाकडून आकारण्यात येणार नाही. या कार्डाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ अल्पदरात पीक कर्जच नाही तर उपलब्ध मर्यादेपर्यंत शेतीपूरक व्यवसाय उदा. पशु पालन आणि मत्स्यपालन व्यवसायालाही कर्ज मिळेल.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सर्व बँका, कृषी विभाग, मत्स्यपालन विभाग, ग्रामीण विकास यंत्रणा, ग्रामपंचायत, पटवारी यांना सूचना देऊन आणि बँक शाखानिहाय मेळावे घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना केसीसी कार्ड वितरीत करण्याचे आदेश दिले आहेत.

सांगली जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 3 लाख 20 हजार शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतला आहे. या उलट जिल्ह्यात उपयोगात असलेल्या केसीसी कार्ड धारकांची संख्या 1 लाख 75 हजार हजारांच्या आसपास आहे. उर्वरित शेतकऱ्यांना केसीसी कार्ड वितरीत करून या योजनेतील लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम सर्व संबंधित विभागांना करावयाचे आहे, असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.या मोहिमेच्या प्रगतीचा वेळोवेळी आढावा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी घेणार असून जिल्ह्यातील बँकांच्या सर्व शाखांनी या मोहिमेसाठी शाखा पातळीवर मेळावे आयोजित करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना केसीसी कार्ड वितरीत करावे. तसेच या कामासाठी सर्व संबंधित विभागांनी त्यांच्या तालुका, ग्रामस्तरीय यंत्रणेमार्फत बँकांना सहकार्य करावे, असे आवाहन अग्रणी जिल्हा प्रबंधक आर.पी. यादव यांनी केले आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीFarmerशेतकरीSangliसांगली