शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

महागाईने करपली भाकरी; राज्यात ज्वारीच्या क्षेत्रात सव्वाचार लाख हेक्टरने घट, दरात वाढ

By अशोक डोंबाळे | Updated: February 9, 2023 14:45 IST

ऊस, फळबागा आणि अन्य पिकांकडे शेतकरी वळल्यामुळे ज्वारीचे क्षेत्र घटल्याचा तज्ज्ञांचा अंदाज

अशोक डोंबाळेसांगली : गरिबांचे प्रमुख अन्न असलेली भाकरी दिवाळीनंतर महागली आहे. महाराष्ट्रात ज्वारीचे क्षेत्र चार लाख ३२ हजार ३७५ हेक्टरने घटल्यामुळे ज्वारीचे दर वाढले आहेत. दिवाळीपूर्वी ३५ रुपये किलो असलेला शाळू सध्या ४५ ते ५३ रुपये झाला आहे. गव्हापेक्षा ज्वारीचा दर अधिक असल्यामुळे भाकरीची श्रीमंतांचे अन्न होण्याकडे वाटचाल सुरू आहे.कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात २०१६-१७ ते २०२०-२१ यादरम्यान ज्वारीचे क्षेत्र १७ लाख ३६ हजार २८६ हेक्टर होते. २०२२-२३ या वर्षात ते १३ लाख ३९११ हेक्टरवर आले आहे. चार लाख ३२ हजार ३७५ हेक्टरने घट झाली आहे. ऊस, फळबागा आणि अन्य पिकांकडे शेतकरी वळल्यामुळे ज्वारीचे क्षेत्र घटल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. लागवड कमी झाल्यामुळे सध्या ज्वारीचे दर वाढल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. दिवाळीपूर्वी ३० ते ३५ रुपये किलो असणारी ज्वारी ४५ ते ५३ रुपयांवर गेली आहे.श्रीमंतांनाही गोड वाटू लागली गरिबांचे प्रमुख अन्न म्हणून भाकरी ओळखली जाते. ग्रामीण भागात भाकरीला पसंती असली, तरी शहरात गव्हाची चपाती खाणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी शाळूपेक्षा गव्हाचा दर अधिक असायचा. परंतु, भाकरीमुळे शरीराला फायदा होत असल्याने अनेकजण चपाती सोडून भाकरीकडे वळत आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांकडून ज्वारीची भाकरी खाण्याबाबत सल्ला दिला जात असल्यामुळे गरिबाघरची भाकरी श्रीमंतांनाही गोड वाटू लागली आहे.आवक घटल्यामुळे दर वाढलेसांगली बाजार समितीमध्ये एप्रिल २०१८ ते फेब्रुवारी २०१९ पर्यंत ९० हजार २८३ क्विंटल शाळूची आवक झाली होती. सरासरी दर ३२०० ते ३५०० रुपये क्विंटल होता. यंदा याच काळात ८६ हजार २१ क्विंटल आवक झाली आहे; तर सरासरी दर ४५०० ते ५३०० रुपये क्विंटल आहे.

ज्वारीचे क्षेत्र घटल्यामुळे स्थानिक ज्वारीची आवक यंदा घटली आहे. ती बाजारात आली असती, तर शाळूचे दर वाढले नसते. यंदा शाळूचा हंगाम उशिराने सुरू झाला आहे. त्यामुळे दरवाढ झाली आहे. पंधरा दिवसांत नवीन शाळू बाजारात येईल. - संजय चौगुले, होलसेल व्यापारी, सांगली.

टॅग्स :Sangliसांगली