शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

SSC Result2024: काठावर पास होणाऱ्या मुलांची सांगलीत मिरवणूक, आव्हान स्वीकारुन मिळविले चांगले यश

By अविनाश कोळी | Updated: May 27, 2024 18:54 IST

सांगली : काबाडकष्ट करुन कसाबसा संसाराचा गाडा हाकणाऱ्या कुटुंबातील मुलांचा शैक्षणिक प्रवासही तितकाच खडतर असतो. शैक्षणिक वातावरणापासून दूर असलेल्या ...

सांगली : काबाडकष्ट करुन कसाबसा संसाराचा गाडा हाकणाऱ्या कुटुंबातील मुलांचा शैक्षणिक प्रवासही तितकाच खडतर असतो. शैक्षणिक वातावरणापासून दूर असलेल्या व सतत काठावर पास होणाऱ्या मुलांच्या आयुष्यात शिक्षणाचा बहर फुलविणारा एक उपक्रम सांगलीत राबविण्यात आला. चांगले गुण मिळविले तर गल्लीतून वाजत गाजत मिरवणूक काढण्याचे चॅलेंज या मुलांनी स्वीकारले अन् ते यशस्वी केले. सोमवारी दहावीचा निकाल लागताच या गरिबाघरच्या मुलांची मिरवणूक काढण्यात आली.कुपवाड ते बुधगाव रस्त्यावर वसलेल्या बाळकृष्ण नगरमधील मुलांच्या यशाची कहाणी सध्या चर्चेत आहे. भारती विद्यापीठाचे माजी संचालक डॉ. नितीन नायक या उपक्रमाचे नायक ठरले आहेत. परिसरात हातावरचे पोट असलेली लोकवस्ती अधिक आहे. घरातले पुरुष व महिला दिवसभर मोलमजुरी करण्यासाठी जात असल्याने मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविक होते. मुलांच्या शिक्षणाची ही पडझड डॉ. नायक यांच्या लक्षात आली. त्यांनी या मुलांशी संवाद साधला. कधी मस्करीत तर कधी उपदेशाचे डोस पाजून त्यांनी मुलांना शिक्षणाच्या प्रगतीशील वाटेवरुन चालण्यास शिकविले.काठावर पास होणाऱ्यांनी यंदाच्या दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळविले, तर त्यांची गल्लीतून वाजत गाजत मिरवणूक काढू, अशी पैज डॉ. नायक यांनी लावली. मुलांनी पैजेचा विडा उचलला. आव्हानाप्रमाणे अभ्यासात मुले गुंतली. सोमवारी दहावीचा निकाल लागल्यानंतर उपक्रम राबविणाऱ्या डॉ. नायक यांना या मुलांनी आश्चर्याचा धक्का दिला. मुलांनी ५० ते ९१ टक्क्यांपर्यंत मजल मारली. नायक यांच्या उपक्रमाला यश मिळाल्याने त्यांनी आनंदाने मिरवणूक काढली.

दऱ्याबाच्या चेहऱ्यावर फुलले हसूप्रातिनिधिक स्वरुपात दऱ्याबा देवकते या ५१ टक्के गुण मिळविलेल्या विद्यार्थ्याची मिरवणूक काढण्यात आली. डोईवर घेत पुष्पहार घालून, गुलालाची उधळण करीत घोषणा देत ही मिरवणूक काढण्यात आली. दऱ्याबाच्या चेहऱ्यावर यामुळे हसू फुलले.

या मुलांनी जिंकली पैजयशस्वी झालेल्या मुलांमध्ये शिवम मारनोर (९१ टक्के), अविनाश काळे (८०), राम माने (६७), स्वप्निल माने (६०), धनश्री कटरे (५६), दऱ्याबा देवकते (५१), आदर्श शिंदे (४५) व अनिकेत माने (३५) यांचा समावेश आहे.

टॅग्स :SangliसांगलीSSC Resultदहावीचा निकाल