शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

सोनहिरा साखर कारखाना आणखी ३०० रुपये देणार

By admin | Updated: April 15, 2015 00:28 IST

पतंगराव कदम : सरकारच्या उपाययोजनांमुळे दिलासा

वांगी/कडेगाव : शासनाने साखर कारखान्यांना २ हजार कोटींचे बिनव्याजी कर्ज दिले, ऊस खरेदी करमाफी, मळीवरील निर्बंध उठविले आहेत, निर्यात साखरेसाठी अनुदान दिले, केंद्र शासनाने ५० लाख टन साखरेचा बफरस्टॉक केला. या उपाययोजनांमुळे साखर कारखानदारीला दिलासा मिळाला आहे. यामुळे सोनहिरा साखर कारखान्याला आणखी ३०० रुपये ऊसदर देणे शक्य आहे. यापूर्वी ‘सोनहिरा’ने १९०० आणि २०० असा २१०० रुपये पहिला हप्ता दिला आहे, असे कारखान्याचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांनी सांगितले. वांगी (ता. कडेगाव) येथील सोनहिरा कारखान्यावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ. कदम म्हणाले की, साखरेचे दर घसरल्यामुळे व अन्य अडचणींमुळे एफआरपीप्रमाणे ऊसदर देणे शक्य नव्हते. याबाबत विधानसभेत अनेकदा चर्चा झाली, परंतु मार्ग निघत नव्हता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील आणि साखर कारखानदारीशी संबंधित २५ आमदारांची बैठक झाली. यावेळी आमदारांनी आपल्या समस्या मांडल्या. यामुळे शासनाने वरील उपाययोजना केल्या. आणखी ३०० रुपये ऊसदर देणे शक्य आहे. (वार्ताहर)