शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुलाने फेडले गरीब, मूकबधिर आई-वडिलांचे पांग; पहिल्याच प्रयत्नात स्पर्धा परीक्षेत यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 08:22 IST

शैलेशचे वडील चवगोंडा बापूसोा पाटील व आई ललिता  दोघेही जन्मत:च मूकबधिर. घरी केवळ एकरभर शेती असल्याने ते शेतमजुरी करतात.

- सदानंद औंधेलोकमत न्यूज नेटवर्कमिरज (जि. सांगली) : जन्मजात मूकबधिर असलेल्या दाम्पत्यांना जन्मजात गरिबीची दाहकताही मिळाली.  तरीही मुलाच्या माध्यमातून त्यांनी आनंदाच्या वाटा शोधल्या. त्याच्या आशेवर कष्ट उपसले. मुलानेही त्यांच्या कष्टाची जाण ठेवत शिक्षणात कष्ट घेतले आणि वयाच्या २८ व्या वर्षी त्याने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. कळंबी (ता. मिरज)  येथील शैलेश चवगोंडा पाटील याने स्पर्धा परीक्षेत राज्यात ४१ वा क्रमांक मिळवून जलसंपदा विभागात सहायक अभियंतापदाला गवसणी घातली. 

शैलेशचे वडील चवगोंडा बापूसोा पाटील व आई ललिता  दोघेही जन्मत:च मूकबधिर. घरी केवळ एकरभर शेती असल्याने ते शेतमजुरी करतात. शैलेशची आई कपडे शिवून संसाराला हातभार लावतात. प्रतिकूल परिस्थितीसमोर हतबल न होता दाम्पत्याने दोन्ही मुलांना पदवीपर्यंत शिकविले. 

शैलेशने सिव्हिल अभियंता पदवी घेतली. स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास सुरू केला. शिकवणी परवडणारी नसल्याने बसने  मिरजेत जाऊन ग्रंथालयात परीक्षेचा अभ्यास  केला. २०२२ मध्ये त्याने परीक्षा दिली. एप्रिल २०२३ मध्ये परीक्षेचा निकाल लागला. पहिल्या प्रयत्नातच शैलेशने यश संपादन केले. 

त्यांच्या डोळ्यांत चमकतोय आनंदशैलेश याचे आई-वडील ऐकू व बोलू शकत नाहीत; मात्र मुलाने मिळविलेल्या यशाचा आनंद त्यांच्या डोळ्यात पाहून शैलेश यालाही समाधान वाटले. चवगोंडा व ललिता हे दाम्पत्य खाणा-खुणा करून मुलाच्या यशाचे वर्णन करीत आहेत.

टॅग्स :Educationशिक्षण