शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

sangli news: खानापूरचे जवान नायब सुभेदार जयसिंग भगत अनंतात विलीन; लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 14:22 IST

सियाचिन येथे कर्तव्य बजावताना बर्फवृष्टीमुळे मेंदूतील रक्तपुरवठा गोठल्याने कोम्यात गेल्याने झाला मृत्यू

पांडुरंग डोंगरे

खानापूर : खानापूरचे सुपूत्र, जवान नायब सुभेदार जयसिंग (बाबू) शंकर भगत (वय-४०) यांचे लेह लडाख विभागातील सियाचिन मध्ये देशसेवेचे कर्तव्य बजावताना निधन झाले. त्यांच्यावर आज, शनिवारी खानापुरात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.जवान नायब सुभेदार जयसिंग (बाबू ) शंकर भगत यांचे पार्थिव पुणे येथून सकाळी नऊ वाजता खानापूर येथे आणण्यात आले. 'शहीद जवान अमर रहे ' ' नायब सुभेदार जयसिंग बाबू भगत अमर रहे ' ' भारत माता की जय ' अशा जयघोषात खानापूर शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत शालेय विद्यार्थी, तरूण वर्ग, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान भगत यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा काळीज पिळवटून टाकणारा होता. पत्नी व लहान मुलांचे निशब्द चेहरे पाहून उपस्थितांना अश्रू अनावर झाले. खानापूर - गोरेवाडी रस्त्यालगत भगत यांच्या घराच्या पूर्वेला पटांगणावर जवान भगत यांचेवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी भारतीय सैन्यदलाच्या २२ मराठा लाइट इन्फनट्रीच्या वतीने पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. लष्करी व शासकीय मानवंदना देण्यात आली.महाराष्ट्र शासनाच्यावतीने पालक मंत्री सुरेश खाडे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार गोपिचंद पडळकर, माजी आमदार सदाशिवराव पाटील, नगराध्यक्ष डॉ उदयसिंह हजारे, जिल्हाधिकारी डॉ दयानिधी राजा, उपजिल्हाधिकारी विजया पांगारकर, उपविभागीय अधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेत शेळके, पोलीस निरीक्षक संतोष डोके, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण केले.खानापूर येथील जवान शहीद जयसिंग भगत हे सियाचिन येथे भारतीय सैन्यदलात कर्तव्य बजावत होते. दोन दिवसांपूर्वी सियाचिन येथे बर्फवृष्टी झाली होती. त्यावेळी झोपेत त्यांचा मेंदूतील रक्तपुरवठा गोठल्याने ते कोम्यात गेले. सदर घटना त्यांच्या साथीदारांच्या सकाळी निदर्शनास आली. त्यांनी सैन्यदलाच्या हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. पुढील उपचारासाठी त्यांना चंदीगड येथे दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. शहीद नायब सुभेदार जयसिंग (बाबू) शंकर भगत हे सन २००३ मध्ये सैन्य दलात भरती झाले होते. सन २०२६ मध्ये सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा, वडील, भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.

टॅग्स :Sangliसांगली