शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: शिरसगावात सौरऊर्जा प्रकल्पाचे काम बंद पाडले, ग्रामस्थांचा विरोध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 17:54 IST

ग्रामसभेत प्रशासनाविरुद्ध संताप

कडेगाव : शिरसगाव तालुका कडेगाव येथे ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ हा प्रकल्प सुमारे २२ एकर गायरानात उभारला जात आहे. या प्रकल्पाविरोधात एकत्र येत शिरसगाव येथील ग्रामस्थांनी या प्रकल्पाचे काम बंद पाडले.शेतकऱ्यांना दिवसा विजेचा पुरवठा व्हावा म्हणून राज्य सरकारच्या वतीने सर्वत्र सौरऊर्जा प्रकल्प उभारले जात आहेत. शिरसगाव गावात हा प्रकल्प उभारण्याचे काम मागील महिनाभरापासून सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्या ठिकाणची जुनी झाडे तोडण्यात आली. वन खात्याने ८०५ पैकी ४६६ झाडे तोडण्यास काही शर्तींवर परवानगी दिली होती. झाडे तोडल्यावर गावच्या हद्दीमध्ये पुन्हा वृक्षारोपण करण्यात यावे असे, या आदेशामध्ये नमूद करण्यात आले होते. परंतु, नवीन झाड लावण्यात आलेले नाही.शिरसगाव हद्दीत गायरान क्षेत्र २५ एकर आहे. यातील १ एकर जागा २०१३ मध्ये वीज वितरण केंद्राला देण्यात आली आहे. उर्वरित क्षेत्रामध्ये सौरऊर्जा प्रकल्प उभारल्यावर गावासाठी गायरान उरणार नाही. त्यामुळे हा प्रकल्प नको, असा ठराव शुक्रवारी (दि. १० जानेवारी) संपन्न झालेल्या ग्रामसभेत करण्यात आला आहे. परंतु, त्यास न जुमानता प्रकल्पाचे काम शुक्रवारी दिवसभर सुरूच होते. शासनाने आमच्यावर कितीही दडपण आणले, तरी आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका शिरसगाव येथील ग्रामस्थांनी घेतली आहे.

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची ग्रामसभेत मागणीसौर ऊर्जाप्रकल्पासाठी शिरसगाव येथील गायरान जमीन हस्तांतरण करण्याबाबत प्रशासनातील अनेक विभागांच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत व ग्रामस्थांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचेही उल्लंघन केले आहे. या सर्व घटनाक्रमाशी संबंधित दोषी अधिकाऱ्यांची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून त्यांना निलंबित करावे, अशा मागणीचा ठराव शुक्रवारी झालेल्या ग्रामसभेत करण्यात आला. 

टॅग्स :Sangliसांगली